birth.j 
विदर्भ

कोरोनाच्या संकटातही अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उमलले जीवन! एक हजारावर बालकांचा जन्म

राज इंगळे

अचलपूर(जि. अमरावती) : जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नाही. कोरोनामुळे सारे जग मृत्यूच्या सावटात असतानाही जन्म सोहळेही सुरूच होते. आरोग्य यंत्रणा कोरोनाला रोखण्यात व्यस्त असली तरी बाळंतपणाचे कर्तव्यही या काळात डॉक्‍टर आणि आरोग्य यंत्रणेने चोख पार पाडले. आणि कोरोनाच्या संकटातही अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात तब्बल एक हजारावर बालकांनी जन्म घेतला.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांनी आपली जबाबदारी पार पाडली. या तीन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात या रुग्णालयात 1 हजार 150 बालकांनी जन्म घेतला आहे.

देशासह राज्यात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल 636 महिलांची प्रसूती करण्यात आली. आणि ग्रामीण भागातील आरोग्याचा कणा असलेल्या प्राथमिक आरोग्यकेंद्रातसुद्धा या तीन महिन्यांत 514 प्रसूती झाल्या आहेत.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात विविध चार टप्प्यांत लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात आरोग्ययंत्रणेवर प्रचंड ताण पडलेला आहे. सद्यस्थितीत प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार बाह्यरुग्ण विभागासह काही आरोग्यसेवा तात्पुरत्या थांबविल्या आहेत. मात्र उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभाग हा सुरुवातीपासून सेवा देत असून अखंडपणे कार्यरत आहे.

सविस्तर वाचा - मोहम्मदने यू ट्यूबचा आधार घेत मिळविले प्रेरणादायी यश

तालुक्‍यासह मेळघाटातील सर्वसामान्य वर्गातील महिला, गरोदर महिला या उपचारासाठी तसेच प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात तथा प्राथमिक आरोग्यकेंद्रात मोठ्या संख्येने दाखल होत असतात. सध्या कोरोनाचे संकट असतानाही उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्‍यात कार्यरत असलेले डॉक्‍टर, कर्मचारी अविरतपणे आपली सेवा बजावत आहेत. त्यांच्या या संकटकालीन परिस्थितीत दिलेल्या सेवेमुळे तीन महिन्यांच्या काळात 1 हजार 150 बालकांनी जग पाहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT