mseb 
विदर्भ

चंद्रपुरात महावितरणची धडक कारवाई; तब्बल साडे चार हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : 2020 पासून वीजबिलांची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या चंद्रपूर परिमंडळातील चार हजार 585 ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च 2020 रोजी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव असतानादेखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीज पुरवठा केला. एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या दहा महिन्यांच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. मात्र, आता वरिष्ठ कार्यालयातून या सर्व ग्राहकांकडून 28 फेब्रुवारीपर्यंत वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

24 फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडलातील घरगुती ,वाणिज्यिक व औद्योगिक अशा चार हजार 585 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात चंद्रपूर 3358 घरगुती, 1058 वाणिज्यिक आणि 169 औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. चंद्रपूर मंडलातील 1491 घरगुती , 767 वाणिज्यिक व 114 औद्योगिक ग्राहक तसेच गडचिरोली मंडळातील 1867 घरगुती, 291 वाणिज्यिक व 55 औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

24 फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा 88 हजार 214 ग्राहकांनी एप्रिल 2020 पासून एकंदरीत 70 कोटी 20 लाखांचा भरणा केला नाही. चंद्रपूर मंडळातील 46 हजार 879 हजार ग्राहकांनी 44 कोटी 50 लाख, तर गडचिरोली मंडळातील 41 हजार 335 ग्राहकांनी 25 कोटी 80 लाख भरले नाही. 

दरम्यान, 28 फेब्रुवारीपर्यंत अशा थकबाकीदारांनी थकबाकीचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT