Murder of a woman separated from her husband in Yavatmal district 
विदर्भ

मामाच्या घरी जात असल्याचे सांगून घरून निघाली आणि रात्री घरी परतली नाही; पहाटे उघडकीस आला थरार

तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ) : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेच्या डोक्‍यावर दगडाने प्रहार करून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (ता. ११) सकाळी तालुक्‍यातील वांजरी शिवारात उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे.

जया मनोज आवारी (वय ३२, रा. पटवारी कॉलनी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह वरोरा येथील मनोज आवारीसोबत झाला होता. मात्र, गेल्या सात वर्षांपासून पतीसोबत पटत नसल्याने ती विभक्त झाली होती. ती आपल्या दोन मुलांसह शहरातील पटवारी कॉलनी येथे भाड्याच्या घरात राहत होती.

गुरुवारी (ता. दहा) रात्री आठच्यादरम्यान लगतच राहत असलेल्या मामाच्या घरी जात असल्याचे सांगून घरून निघाली आणि रात्री घरी परतली नाही. दरम्यान, आज सकाळी वांजरी शिवारातील बडवाईक यांच्या शेतातील बंड्याजवळ तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांनी घटनास्थळ गाठले.

मृतदेह अनोळखी असल्याने तिची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, तिचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होताच अवघ्या एका तासात महिलेची ओळख पटली. दगडाने जोरदार प्रहार केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स, MI vs RR सामना खेळणार की नाही? मुंबईच्या कोचचे वैभव सूर्यवंशीबद्दलही विधान

Ambajogai News : स्वारातीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्याने संपविले जीवन; कारण अस्पष्ट

Nanded Crime News: 3 दिवसात ५ खून, नांदेड हादरलं, अशोक चव्हाण आक्रमक..

Baramati By Election: बॅनरबाजी चर्चेत, आदिती तटकरे चांगल्याच चिडल्या...

Satana News : अवकाळीच्या जखमेवर तांत्रिक मीठ; ७/१२ पोर्टल ठप्प, शेतकरी हवालदिल!

SCROLL FOR NEXT