nagpur news  sakal
विदर्भ

Nagpur Crime : दिवाणमध्ये आढळला आई व मुलाचा कुजलेला मृतदेह,आई-भावाच्या खूनप्रकरणात मुलाविरुद्ध गुन्हा

घराला कुलूप लावलेले आढळून आले व घराच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे जाणवल्यावर त्यांनी मोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

सकाळ वृत्तसेवा

मोर्शी - येथील शिवाजीनगर परिसरात कुलूपबंद घरात आई व मुलाचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. मोठ्या मुलाने आई व भावाचा खून केल्याच्या संशयावरून मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोर्शीच्या शिवाजीनगर येथील रहिवासी नीलिमा गणेश कापसे (वय ४८) व त्यांची दोन मुले स्वतःच्या मालकीच्या घरात राहत होती. मृत नीलिमा यांचे वडील हे नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे राहतात. गेल्या काही दिवसांपासून ते मुलगी व नातवांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी एक सप्टेंबर रोजी मोर्शी गाठले.

त्यांना नीलिमा यांच्या घराला कुलूप लावलेले आढळून आले व घराच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे जाणवल्यावर त्यांनी मोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

या तक्रारीवरून मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वेरूळकर, पोलिस अंमलदार योगेश सांबारे, पंकज साबळे आणि विजय आगतकर यांनी घटनास्थळी जाऊन घराची पाहणी केली. दाराचे कुलूप फोडले असता घरातून दुर्गंधी येत होती.

मोर्शी नगरपालिकेचे कर्मचारी विजय दाभाडे व राहुल यांना बोलवून घरात शोध घेतला असता घरातील बेडरूममधील दिवाणाच्या बॉक्समध्ये नीलिमा गणेश कापसे (वय ४८) व त्यांचा लहान मुलगा आयूष गणेश कापसे (वय १८) या दोघांचे कुजलेले मृतदेह आढळून आले.

पोलिसांनी तपास केला असता मृत नीलिमा यांचा मोठा मुलगा सौरभ गणेश कापसे हा बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले.

शनिवारी सकाळी कुजलेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले व त्यांचे मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. अमरावतीचे अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव व मोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट दिली.

दरम्यान, आज ७५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संशयित सौरभ गणेश कापसे याच्याविरुद्ध खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्याचा शोध पोलिस घेत असून त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही, त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP removes spokesperson Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीत फूट? प्रवक्ता विजेता दहियांचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, 'मलाच बळीचा बकरा बनवलं'

Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

SCROLL FOR NEXT