विदर्भ

बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता

सकाळवृत्तसेवा

धामना लिंगा, (जि. नागपूर)- नागपूर-अमरावती मार्गावरील वेणा जलाशयाजवळच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ रविवारी दहा युवक नाव उलटून पाण्यात बुडाल्याची घटना सायंकाळी घडली. बुडाल्यांपैकी नावाडी अतुल ज्ञानेश्‍वर बावने (वय २२, रा. पेठ) एकमेव बचावला असल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले असून, सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

नागपूर-अमरावती महामार्गावरील गोंडखैरीनजीक वेणा जलाशय आहे. येथे सुटीच्या दिवशी आसपासचे नागरिक पर्यटनासाठी येत असतात. आज रविवारी चौदा मैल येथील सिटीलाईन रुग्णालयाचे तीन कर्मचारी व काही मित्र असे एकूण दहा जण सुटी असल्यामुळे येथे आले. हे सर्व वेणा जलाशयाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे जात असताना वजन जास्त झाल्याने नाव एका बाजूने झुकून कलंडली. यात सर्व दहा जण जलाशयात बुडाले. नावाडी अतुल ज्ञानेश्‍वर बावने (वय २२) पोहणे येत असल्याने बचावला. कळमेश्‍वर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत सहा जणांचे मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले होते. दोघांचे मृतदेह चौदा मैल सिटीलाइन हॉस्पिटल आठवा मैल येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

शोधमोहिमेत आठवा मैल येथील सिटीलाइन रुग्णालयाचे कर्मचारी अमोल मुरलीधर दोडके (वय २८, रा. दत्तात्रयनगर, नागपूर), अंकित अरुण भोसेकर (वय २२, रा. हिंगणा) यांच्यासह अक्षय मोहन खांदारे (वय २२, पेठ काळडोंगरी), राहुल जाधव (नवीन सुभेदारनगर, नागपूर), रोशन ज्ञानेश्‍वर खंदारे (वय २३, पेठ काळडोंगरी) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. रात्री उशिरा आणखी एक मृतदेह शोधण्यात यश आले. परेश काटोके, अतुल भोयर (हुडकेश्‍वर), पंकज डोईफोडे (उदयनगर, नागपूर), प्रतीक आमडे (उदयनगर, नागपूर) यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT