9 X ray technicians appointment in government medical college nagpur 
नागपूर

सकाळ IMPACT : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची दयनीय अवस्था होणार दूर, ९ एक्स-रे तंत्रज्ञांची तत्काळ नियुक्ती

केवल जीवनतारे

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडीकल) १२ पोर्टेबल एक्स-रे मशीन आहेत. ४०० खाटांसाठी आणखी ५ पोर्टेबल एक्स-रे मशीन वाढविण्यात आले आहेत. त्या तुलनेत मेडिकलमध्ये अवघे १० ते १२ एक्स-रे तंत्रज्ञ आहेत. मेडीकलमधील ही दयनीय अवस्था ई सकाळने आपल्या वृत्तातून समोर आणली होती. त्याची दखल घेत तत्काळ ९ एक्स-रे तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात(मेडीकल)६०० खाटांच्या कोविड रुग्णालयामध्ये लवकरच ४०० खाटांची भर पडणार, अशी घोषणा करण्यात आली. त्यासाठी मेडिकल कोविड समिती तयार केली. या समितीने ४०० खाटांसाठी १९ कोटींचा प्रस्ताव तयार केला. मात्र, मनुष्यबळाचे काय?  असा सवाल सकाळने आपल्या वृत्तातून उपस्थित केला होता. 

विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी या विषयावर विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती आहे. सध्या रुजू होणाऱ्या ९ एक्स रे तंत्रज्ञांची नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरुपातील आहे. साथरोगाच्या पार्श्वभूमीवर निकषानुसार ५०० खाटांसाठी आवश्यक एक्स-रे तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याची बाब सकाळने उजेडात आणल्यानंतर तत्काळ नियुक्तीचे आदेश दिले आहेत. ४०० खाटा वाढविल्यानंतर एक्स-रे मशीनवर काम करणाऱ्या तंत्रज्ञांवर येणारा भार त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो, ही बाब प्रकर्षाने मांडली. 

विशेष असे की, २५० एमबीबीएस विद्यार्थीसंख्या असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८ एक्स-रे तंत्रज्ञ आणि ४ सहाय्यकांची आवश्यकता असते, तर रुग्णालय विभागात ५०० खाटांसाठी ९ एक्स-रे तंत्रज्ञ आणि ५ सहाय्यकांची गरज आहे. मेडिकलमध्ये १७०० खाटा आहेत. येथे ३० एक्स-रे तंत्रज्ञांची गरज आहे. १७ सहाय्यकांची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीत मेडिकलमध्ये १० ते १२ एक्स-रे तंत्रज्ञ कार्यरत असल्याचे विदारक सत्य पुढे आले. मात्र, कोविडच्या या संकटातही जीव मुठीत घेऊन मेडिकलमधील एक्स-रे तंत्रज्ञ सेवा देत आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक करीत सध्या ९ वाढीव तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याबद्दल क्ष-किरण तंत्रज्ञ संघटनेचे सचिव प्रकाश गढे यांनी सकाळ माध्यम समूहाचे आभार मानले.

संपादन - भाग्यश्री राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT