physical abuse girl crime  esakal
नागपूर

Nagpur Crime: नात्याला काळीमा फासणारी घटना! नराधम मामाकडून चार वर्षीय भाचीवर अत्याचाराचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

हिंगणा: एमआयडीसी पोलिस ठाणेअंतर्गत वैशाली नगर परिसरात नातेवाइकानेच चार वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.ही घटना शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. त्यानंतर आज,रविवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

अभिजित शेषराव मानेकर (वय २५) रा. एकात्मता नगर, हिंगणा रोड नागपूर असे आरोपीचे नाव आहे. तर पीडित बालिका ही एकात्मता नगराला लागून असलेल्या दुसऱ्या नगरात आईसोबत राहते.तिला वडील नाही.आरोपी हा दूरचा मामा लागतो.

त्यामुळे पीडितेच्या घरी त्याचे जाणे-येणे होते. १० जून रोजी पीडितेची आई मजुरीचा गेली होती. दुपारी चार वाजता आरोपी बालिकेला घेऊन घराशेजारी असलेल्या नाल्याजवळ घेऊन गेला. तिथे पीडितेसोबत अश्लील चाळे करत असताना काही तरुणांना दिसला.

ते मुलीच्या मदतीला येताना पाहून आरोपी पळून गेला.त्यानंतर लोकांना वाटले की, हा पुन्हा मुलीच्या घराकडे येणार नाही. पण रविवारी ( ता.११)पुन्हा सकाळी आरोपी मुलीच्या घराकडे येताना दिसला. परिसरातील तरुणांनी त्याला पकडले.

पोलिस व मुलीच्या आईला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार भीमा नरके यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शारदा भोपाळे करीत आहेत.

वैशालीनगर व एकात्मता नगरमधून जाणाऱ्या या नाल्याशेजारी नेहमी दारुडे व प्रेमी युगुल,तरुणांचा वावर असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT