नागपूर

न्यायालय म्हणाले, जामीन अर्ज मंजूर केला तर समाजात चुकीचा संदेश जाईल

सतीश तुळसकर

उमरेड (जि. नागपूर) : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याअंतर्गत कऱ्हाडला क्षेत्रातील कक्ष क्रमांक १४१५ मध्ये एक वाघीण व तीन बछड्यांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना एक ते दोन जानेवारीदरम्यान उघडकीस आली होती. या प्रकरणात आरोपी दिवाकर दत्तूजी नागेकर (रा. नवेगाव साधू) याने सूडबुद्धीने वाघाची शिकार केल्याचे तपासात निदर्शनास आले. आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाने निर्णय देत जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

न्यायालयाच्या निर्णयात वाघ या वन्यप्राण्यांच्या अस्तित्वास असलेला धोका लक्षात घेता या प्रजातीस संरक्षण देणे अभिप्रेत असल्याचे नमूद केले आहे. प्रकरणी आरोपीच्या कालवडीस वाघाने जीवे मारल्याने आरोपीने चार वाघांना जीवे मारले आहे. हा गंभीर गुन्हा आरोपीकडून करण्यात आल्याचे नमूद करून वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला तर समाजात चुकीचा संदेश जाईल, असे नमूद करत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. गांभीर्याने दखल घेत उमरेड येथील प्रथम श्रेणी (कनिष्ठ स्तर) न्यायदंडाधिकारी यांच्याद्वारे दहा फेब्रुवारीपर्यंत आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

या प्रकरणात शासनाच्या वतीने विशेष सल्लागार ॲड. कार्तिक सुकुल यांनी भक्कमपणे बाजू मांडली. प्रकरणी गुन्ह्याचा तपास वन्यजीव सेलू घटक पेंच व्याघ्रप्रकल्पातील सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणी यांच्याद्वारे करण्यात येत असल्याची माहिती विभागीय वनअधिकारी राहुल गवई यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : चाकण परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या बेकायदेशीर विक्रीचा भंडाफोड; २५१ सिलेंडर जप्त

SCROLL FOR NEXT