Parliament Security Breach Esakal
नागपूर

Parliament Security Breach : लोकसभेतील घुसखोरी प्रकरणानंतर आता नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणं केलं बंद

संसदेचे हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू असतानाच संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

संसदेचे हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू असतानाच संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभा सभागृहात कामकाजादरम्यान दोन अज्ञात व्यक्ती घुसल्याच्या प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता नागपूर अधिवेशनातही गॅलरी पासेस देणे बंद करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

दोन्ही सभागृहातील गॅलरी पासेसना बंदी केली आहे. दिल्लीमध्ये लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने तात्काळ निर्णय घेतला आहे. आमदारांना दोन पासेस दिले जातील तीन पास दिले जाणार नाही अशी माहिती विधान परिषद उपासभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी सभागृहात दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

लोकसभा सभागृहात काय घडलं?

संसदेचे हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू असतानाच दोन तरुणांनी सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीतून टिअर गॅस कॅन घेऊन खासदार बसतात तेथे उड्या मारल्या. कामकाजा दरम्यान घुसखोरी केलेल्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही खासदाराच्या नावाने असलेल्या लोकसभा व्हिजीटर पासवर संसदेत आले होते. खासदार दानिश अली यांनी सांगितले की, हे दोघे म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नवावर लोकसभा व्हिजीटर पास घेऊन आले होते. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान याबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले लोकसभा प्रेक्षक गँलरीत दोन लोकांनी उडी‌‌ मारली. सुरक्षा भेदली ‌गेली पासेसबाबत आपणही काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT