ajit pawar said Subject to reservation in promotion in CMs court 
नागपूर

अजित पवार यांनी पदोन्नतीत आरक्षणाचा विषय टाकला सीएमच्या कोर्टात; इतिवृत्तावर दुसऱ्याच दिवशी स्वाक्षरी

नीलेश डोये

नागपूर : पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय उपसमितीने घेतला आहे. इतिवृत्तावर दुसऱ्याच दिवशी माझी स्वाक्षरी झाली. विषय मंत्रिमंडळात घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करीत पदोन्‍नतीत आरक्षणाचा विषय उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला.

फडणवीस सरकारच्या काळात पदोन्नतीत आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. यामुळे मागासवर्गीय वर्गातील ४० हजारांवर अधिकारी, कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले. दरम्यान, पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. परंतु, त्यानंतर काहीच करण्यात आले नाही.

राज्यात महाविकासआघाडीची सरकार आल्यावर पदोन्नतीत आरक्षणाच्या निर्णयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती गठित करण्यात आली होती. उपसमितीने मागासवर्गीयांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. परंतु, दोन महिने झाले असतानाही अद्याप आदेश काढण्यात आला नाही. उपसमितीच्या बैठकीचे इतिवृत्तच अंतिम झाले नसल्याने आदेश निघाले नसल्याचे वृत्त दै. ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, बैठकीच्या इतिवृत्ताची फाइल १९ जानेवारीला आली. २० तारखेलाच यावर स्वाक्षरी झाली. विषय मंत्रिमंडळात घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री यांना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनातील काही अधिकारी याच्या विरोधात असल्याने हा विषय लांबविण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पदोन्नतीत आरक्षणाची फाइल मुख्यमंत्री कार्यालयाकडे आहे. एक, दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Garbage Dump Accident : मेंदीचा रंग उतरण्याआधीच कुंकू पुसले; अक्षय सावंतच्या निधनाने पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अवघ्या दोन महिन्यांत संसाराची राखरांगोळी

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

Latest Marathi News Update : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Pune: रेंजहिल्स परिसरात ज्येष्ठ महिलेचा एकाकी अंत; परदेशात स्थायिक मुलाकडून पाचव्या दिवशी अंत्यसंस्कार

Telangana Crime: तेलंगणात आरोपीकडून सामूहिक हत्याकांड; पत्नी व दोन मुलांसह सहा जणांचा खून; हल्लेखोर राजकुमार फरार

SCROLL FOR NEXT