Krupal Tumane Vs Ajit Pawar  sakal
नागपूर

Krupal Tumane Vs Ajit Pawar : गद्दार कोण हे महाराष्ट्राला ठाऊक; कृपाल तुमाने यांचे अजित पवारांवर टीकास्त्र

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गद्दार संबोधल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि खासदार चांगलेच भडकले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गद्दार संबोधल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि खासदार चांगलेच भडकले आहेत. ‘गद्दार कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने पहाटेच्या शपथविधीच्या वेळी बघितले, असे टीकास्त्र रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी सोडले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी पदाधिकाऱ्यांचे शिबिर नागपुरात पार पडले. त्यावेळी अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत मतदान करताना ‘पन्नास खोके, एकदम ओके‘ विसरू नका असे सांगताना गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहन केले होते.

यावर बोलताना तुमाने यांनी थेट अजित पवार यांच्यावर वार केला. ते म्हणाले, ‘‘अजित पवार यांनी आम्हाला खोक्याची भाषा सांगू नये. ते जलसंपदा मंत्री असताना किती गैरव्यवहार झाले आणि कोणी ट्रक भरून नेले हे सर्वांनाच माहिती आहे.

त्यांच्याच कार्यकाळात झालेल्या सिंचन गैरव्यवहारामुळे डझनभर अधिकाऱ्यां विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. आम्ही गद्दार असू तर हा शब्द त्यांनाच आधी लागू होतो.’’ महाविकास आघाडी सत्ता स्थापनेच्या तयारीत असताना पहाटे शपथविधी उरकून घेणाऱ्याला काय म्हणायचे, असेही तुमाने म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT