Anil Deshmukh said The Chief Minister had demanded an inquiry in the cabinet meeting 
नागपूर

‘मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली होती चौकशीची मागणी; सत्य जनतेसमोर येईल’

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप एकदम चुकीचे आहे. मला व महाविकासआघाडीला बदनाक करण्यासाठी असे आरोप करण्यात येत आहे. माझ्यावर मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी जे आरोप केले आहेत, त्याची चौकशी करावी अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली होती, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला शंभर कोटींचे टार्गेट दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच चर्चा होऊ लागली. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विरोधकांनी आंदोलन पुकारले. मात्र, महाविकासआघाडीने अद्याप त्यांचा राजीनामा घेतलेला नाही.

पदावर असेपर्यंत गृहमंत्र्यांची चौकशी होऊच शकत नाही, असे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, त्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे सरकारला वाटते. या प्रकरणामुळे राज्याची मोठी बदनामी झाली आहे. मात्र, सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर याचे खापर फोडत असल्याचे दिसत आहे. मात्र, अद्याप यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.

आता या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याचे अनिल देशमुख म्हणाले. या आरोपाची चौकशी रिटायर्ड हायकोर्ट जज यांच्या मार्फत होणार आहे. जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल, असेही त्यांनी सांगितले. आता विरोधक यावर काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणे बाकी आहे. मात्र, या प्रकरणामुळे राज्याची बदनामी झाली हे माऊ खरे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT