Attack on the house of a female member of the Gram Panchayat 
नागपूर

‘तुम्ही इथे राहण्याच्या लायकीचे नाहीत’ असे म्हणत महिला सदस्याच्या घरावर केला हल्ला

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) : स्थानिक जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खैरी गावातील ग्रा.पं. सदस्य प्रीती मंगेश मानकर यांच्या घरावर शेजारी राहणाऱ्या मंडळींनी लाठीकाठीने हल्ला चढविला. घरासमोरचा गेट पाडून हल्लेखोरांनी नासधूस केली. भीतीपोटी महिला ग्रा.पं. सदस्य कुटुंबासह दार आतून कुलूपबंद करून दडी मारून लपल्याने अनुचित घटना घडली. ही घटना १२ डिसेंबरला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

पीडिता ग्रा. पं. सदस्य प्रीती मानकर यांनी जुनी कामठी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ग्रा.पं. सदस्य यांना मागील दहा वर्षांपासून शेजारील मंडळीकडून कुठल्या ना कुठल्या कारणावरून होत असलेल्या क्षुल्लक भांडणातून मानसिक त्रास होत आहे. शनिवारी (ता. १२) रात्री आठच्या सुमारास गावातील कुत्र्यांना हाकलून लावले असता शेजारी असलेले मारोती ठाकरे व कुटुंबीयांनी महिलेच्या घरावर लाठीकाठी व सब्बलने हल्ला चढविला.

कुत्र्याला का मारले, यावरून जातीवाचक शिवीगाळ करीत ‘तुम्ही इथे राहण्याच्या लायकीचे नाहीत. फुकटच्या घरात राहता, आपल्या मोहल्यात जा’ असे म्हणत घराचे गेट तोडले. दार आतून कुलूपबंद करून असल्याने गैरअर्जदारांना घरात शिरणे शक्य झाले नाही. दडी मारून भीतीने लपून बसलेल्या ग्रां.प. सदस्य प्रीती मानकर व कुटुंबीयांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली.

वेळीच पोलिस पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान भांडण झालेल्या दोन्ही मंडळींनी पोलिस ठाण्यात तक्रार घेण्यात आली. बातमी लिहितोवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र, भीतीमय स्थितीत असलेल्या व जातीवादाचा अपमान सहन करून बसलेल्या ग्रां.प. सदस्य प्रीती मानकर व कुटुंब यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून ते न्यायाची मागणी करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT