Builder commits suicide due to financial difficulties in Trimurtinagar Nagpur 
नागपूर

‘माझ्यावर जबाबदारी आहे; परंतु, माझा नाइलाज आहे’ अशी चिठ्ठी लिहून बिल्डरची आत्महत्या

अनिल कांबळे

नागपूर : आर्थिक विवंचनेतून एका बिल्डरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी त्रिमूर्तीनगरमधील सागर अपार्टमेंट येथे उघडकीस आली. निखिलेश सतीशचंद्र बुटे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या बिल्डरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिलेश बुटे हे पत्नी भाग्यश्री व चार वर्षीय जुळ्या मुलांसह महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहायचे. सागर अपार्टमेंटमध्ये त्यांची आई व बहीण राहते. त्यांच्याकडे पाणी शुद्धीकरणासाठी (आरो) यंत्र बसविण्यात आले आहे. पाणी आणण्यासाठी ते आईकडे यायचे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ते आईकडे आले. खोलीत गेल्यानंतर त्यांनी पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला.

निखिलेश घरी न परतल्याने पत्नी भाग्यश्री तेथे आल्या. खोलीचा दरवाजा बंद होता. निखिलेश यांना आवाज दिला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने भाग्यश्री यांनी खोलीचा दरवाजा तोडला. निखिलेश हे लटकलेले दिसले. भाग्यश्री यांनी हंबरडा फोडला. माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून निखिलेश यांचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला.

निखिलेश यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सहा पानी चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. ‘मला त्रास देत आहेत. मी कंटाळलो आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. परंतु, माझा नाइलाज असल्याने मी आत्महत्या करीत आहे’, असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: बालिंगा कचरा डेपोला आग; धुरामुळे ग्रामस्थ हैराण!

अवघ्या ६ महिन्यात संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण, 'या' मालिकेची वेळ बदलली

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

SCROLL FOR NEXT