Eknath Shinde sakal
नागपूर

Eknath Shinde : मनसेच्या पाठींब्याने महायुती अधिक घट्ट ; मुख्यमंत्री शिंदे, राज ठाकरे यांचे केले स्वागत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने राज्यात महायुतीच अधिक बळकट होईल, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत राज ठाकरे यांचे स्वागत करून अभिनंदनही केले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने राज्यात महायुतीच अधिक बळकट होईल, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत राज ठाकरे यांचे स्वागत करून अभिनंदनही केले. मनसे लोकसभा लढणार नाही. विधानसभेत ते जागा मागतील त्याचे काय करणार, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी आधी लोकसभा आटोपू द्या, विधानसभेचे नंतर बघू असे सांगितले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना उठबस सेना आहे.

आमची सेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये. सत्तेसाठी ‘उबाठा’ने मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार विकले. धनुष्यबाण गहाण ठेवला. त्यामुळे आम्हाला शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबवण्यासाठी वेगळी भूमिका घ्यावी लागली, असेही मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.

मोदींवर आरोप करण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकारच नाही. त्यांना भेकड म्हणणे योग्य नाही. कोरोनाच्या काळात ते घरी बसले होते. मोदींनी देशातीलच नव्हे तर जगातील लोकांना मदत केली.आरोप लावणारे घरी बसून कोणते शौर्य दाखवत होते, अशी विचारणाही शिंदे यांनी केली.

पंतप्रधानांनी महाराष्ट्रात अनेक सभा दिल्या आहे. त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून येतील, अशी गॅरंटी मतदारांनी मोदींना दिली. महायुती राज्यात ४५ जागा जिंकून मोदींचे हात बळकट करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंद म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT