Sanjay Raut esakal
नागपूर

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नागपुरात तक्रार

खासदार संजय राऊत यांनी मागासवर्गीय असल्याने जाणीवपूर्वक हिन भाषेचा वापर केला त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

राजेश प्रायकर

नागपूर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मागासवर्गीय असल्याने जाणीवपूर्वक हिन भाषेचा वापर केला. त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन खासदार नवनित राणा यांच्या वतीने स्वीय सहायक विनोद गुहे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना आज दिले. त्यामुळे खासदार राऊत व खासदार राणा यांच्यातील संघर्ष आणखी वाढविण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरून आरोप-प्रत्यारोपाचा फैरी सुरू आहे. यातूनच राणाविरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू आहे. खासदार नवनित राणा व त्यांचे पति आमदार रवी राणा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. नुकताच खासदार संजय राऊत यांनी नागपुरात राणा दाम्पत्यांचा बंटी-बबली असा उल्लेख केला. त्यामुळे नवनित राणा यांनी स्वीय सहायकामार्फत नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदन पाठवले.

या दोन पानी निवेदनात त्यांनी खासदार राऊत यांच्यावर अनेक आरोप केले. आपण मागसवर्गिय असल्यामुळेच मुद्दामहून शिवसैनिक खोट्या केसेस करून टोमणे मारत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिवसेना नेते खासदार राऊत यांनी विविध वृत्त वाहिन्यांना मुलाखती देताना आम्हा दाम्पत्याचा वारंवार बंटी बबली, ४२० असा उल्लेख करीत आमची समाजात बदनामी केल्याचेही त्यांनी तक्रारीत नमुद केले आहे.

मुंबईतील खार मधील निवासस्थानावर शिवसैनिक पाठवून घराबाहेर पडण्यास मज्जाव केल्याचे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यात म्हटले आहे. या निवेदनासोबतच गुहे यांनी पोलीस आयुक्तांना पुरावा म्हणून एक पेन ड्रा ईव्हही दिला आहे. राणा यांच्यावतिने देण्यात आलेले हे निवेदन पोलिस आयुक्तांनी स्वीकारले. निवेदनातील आरोपाच्या अनुषंगाने पोलिस चौकशी करीत असल्याचे आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT