vaccine 
नागपूर

धक्कादायक! ग्रामीण भागात अक्षरशः फेकण्यात येतेय कोरोना प्रतिबंधक लस? 

राजेश प्रायकर

नागपूर : केंद्र सरकारने लसीकरण सुरू केले असून पात्र असलेल्या प्रत्येकाला ते घेण्याचे आवाहन केले. परंतु ग्रामीण भागात लस घेण्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लसीचा अपव्यय मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे सूत्राने नमुद केले. शहरात मात्र लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने अपव्यय केवळ सात टक्के असल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले.

जिल्ह्यात सुरवातीला आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वयोगटातील विविध आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना लस देण्यास सुरवात करण्यात आली. शहरात अडथळ्यांचा अपवाद वगळता अनेकजण लस घेण्यास प्रतिसाद देत आहेत. परंतु ग्रामीण भागात अजूनही प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात १३३ लसीकरण केंद्र असून २८ मार्चला शहरातील ३९ केंद्रांवर पहिला तसेच दुसरा डोज, अशाप्रकारे एकूण १६१० जणांनी लस घेतली. ग्रामीण भागातील ९४ केंद्रांवर ३४७८ जणांनी लस घेतली. अर्थात शहरात प्रती केंद्र सरासरी ४१ जणांनी तर ग्रामीण भागात प्रती केंद्र ३७ जणांनी लस घेतल्याचे दिसून येत आहे. 

लसीच्या एका कुप्पीतून केवळ दहा जणांना लस दिली जाते. एका लसीकरण केंद्रांवर १०० लसीचे लक्ष्य आहे. शहरात खासगी हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रात संपूर्ण दहा नागरिक आल्याशिवाय लसीकरण केले जात नाही. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर मात्र नागरिकांना प्राथमिकता दिली जाते. त्यामुळे शहरातील महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर एकूण सात टक्के लसीचा अपव्यव होत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. 

ग्रामीण भागात सर्वाधिक अपव्यय 

दहा टक्क्यापर्यंत लसीचा अपव्यय होणार हे केंद्रानेच ठरवून दिल्याने शहरातील लसीचा अपव्यव मर्यादेत आहे. परंतु ग्रामीण भागात पाच सहा जणांच्या लसीकरणासाठी एक कुप्पी वापरली जात आहे. मुळात पाच सहा जणांच्या लसीकरणानंतर चार तासापर्यंत लसीकरणासाठी कुणीच आले नाही, तर ते फेकण्यात जात असल्याचे सूत्राने नमुद केले. त्यामुळे ग्रामीण भागात लसीचा अपव्यव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना संसर्गजन्य असल्याने नियमांचे पालन करणे हाच यापासून बचावाचा उपाय आहे. ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोव्हिशिल्ड’ अशा दोन लसही उपलब्ध आहेत. कोव्हिड लस सकारात्मक व ऊर्जा देणारी आहे. शासनाने ठरवून दिलेल्या पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी पुढे यावे.
- डॉ. आशिष दिसावल, 
नाक, कान, घसा तज्ज्ञ

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गरज पडल्यास ‘एन्काऊंटर’ही करणार; पदभार स्वीकारताच विश्वास नांगरे-पाटलांचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

EV Policy: पेट्रोल-डिझेल वाहनांना झटका! दिल्लीत नवे EV धोरण लागू; सरकार भरघोस प्रोत्साहन देणार, काय फायदा होणार?

Ayodhya Ram Mandir: चंपत राय चौकशीच्या फेऱ्यात, चोरी प्रकरणानंतर बदलणार कारभाराची रचना? CEO-सचिव पदांसह मोठ्या फेरबदलाची तयारी"

Latest Marathi News Live Update: कोर्टाने नवीन उदाहरण समोर आणलं आहे- मुख्यमंत्री

Mumbai News: सहा महिने पोटदुखी, पण हिमोग्लोबिनची कमतरता मानून दुर्लक्ष; नंतर 21 वर्षीय तरुणीच्या तपासणीत धक्कादायक सत्य समोर आलं

SCROLL FOR NEXT