crime
crime sakal
नागपूर

नागपूर : बनावट किन्नरांनी हडपली रक्कम

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरात काही दिवसांपासून बनावट किन्नरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खऱ्या तृतीयपंथीयांसोबत त्यांचा नेहमीच वाद होतो. शहरातील औरंगपुरा परिसरात एका व्यक्तीकडे मुलगा जन्माला आला. त्या व्यक्तीच्या घरी जाऊन दोन बनावट किन्नरांनी पैसे हडपले. बडनेराच्या निंभोरा परिसरातील खरे तृतीयपंथी औरंगपुरा परिसरात एका व्यक्तीकडे बिदाई रक्कम (दान) मागण्यास गेले असता काही तासांपूर्वीच दोन तृतीयपंथी आले होते व त्यांनी बिदाई रक्कम नेली, असे दान देणाऱ्या व्यक्तीने खऱ्या तृतीयपंथीयांना सांगितले.

दान देणाऱ्या व्यक्तीने पैसे मागणाऱ्या दोघांचे फोटो खऱ्या तृतीयपंथीयांना दाखविले. शहरातील दहा ते बारा तृतीयपंथीयांना त्या फोटोच्या आधारे दोघांचा शोध घेत बिच्छूटेकडी परिसरात गाठला. तोपर्यंत बनावट किन्नर येथे पोचले होते. बनावट किन्नरांना पकडून, धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. अखेर बनावट दोघांना ओरिजनल तृतीय पंथीयांनी पकडून बिच्छूटेकडी येथून थेट राजापेठ ठाण्यात आणले.

त्यांची तृतीयपंथीयांसोबत राहण्याची इच्छा

ज्या दोघांना ठाण्यात(police station) आणले. त्यापैकी एका युवकाच्या पायात जोडवे आणि त्याने महिलांचे वस्त्र परिधान केले होते. त्याने स्वत:हून तृतीयपंथीयांसोबत राहण्याची इच्छा पोलिसांपुढे व्यक्त केली. परंतु पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करण्याचे टाळले.

''दोन बनावट तृतीयपंथीयांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. कुणी कुणासोबत राहावे हा विषय पोलिसांच्या अखत्यारीत येत नाही."

- मनीष ठाकरे,

पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT