Deekshabhoomi sakal
नागपूर

Deekshabhoomi : दीक्षाभूमीवरील भूमीगत पार्किंगचा पुर्नविचार;स्मारक समिती एनएमआरडीशी चर्चा करणार

दीक्षाभूमी येथील सौंदयींकरण आणि नविनीकरणाच्या संदर्भात समाजात अनेक गैरसमज पसरविण्यात आले. त्यासंदर्भात शनिवारी दीक्षाभूमी येथे डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आणि समाजातील मान्यवरांची बैठक झाली. यात पुन्हा भूमिगत वाहनतळाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दीक्षाभूमी येथील सौंदयींकरण आणि नविनीकरणाच्या संदर्भात समाजात अनेक गैरसमज पसरविण्यात आले. त्यासंदर्भात शनिवारी दीक्षाभूमी येथे डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आणि समाजातील मान्यवरांची बैठक झाली. यात पुन्हा भूमिगत वाहनतळाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न समितीच्या पदाधिकारी आणि एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केला.

लोकांच्या भावना लक्षात घेता भूमीगत वाहनतळाबद्दल पुन्हा विचार करण्यासाठी एनएमआरडीए आणि शासकीय अधिकारी यांना त्वरित पत्र देऊन चर्चा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे १ जुलैला लोकांनी दीक्षाभूमीवर येण्याचे टाळावे. जे कुणी अनुयायी दीक्षाभूमीवर येणार असतील त्यांना समितीचे पदाधिकारी सकाळी ११.३० वाजता भेटतील, असे समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दीक्षाभूमीवरील ना.ह. कुंभारे सभागृहात बैठकीला प्रामुख्याने दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले, राजेंद्र गवई, विलास गजघाटे, आनंद फुलझले, प्रदीप आगलावे, मेश्राम, सुटे, प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी एनएमआरडीचे प्रतिनिधी म्हणून इंजिनिअर पाटील यांनी या कामाचे वर्णन केले.

समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी या विकासकामाचा आढावा घेतला. अंडरग्राउंड पार्किंगच्या कामाचे फायदेही समजावून सांगितले. याप्रसंगी राज्य शासनाचे माजी सचिव श्याम तागडे यांनी त्यांच्या कार्यकालातील नासुप्रच्या दीक्षाभूमीवरील प्रोग्रेस रिपोर्टचा सुद्धा आढावा दिला. यावेळी इंजिनिअर पद्माकर गणवीर, रवी शेंडे, उत्तम शेवडे, पुरण मेश्राम, अनिल हिरेखन, अमन कांबळे, भीमराव फुसे, आदींनी विकास कामाबाबत प्रशंसा करून काही सूचना सुद्धा दिल्या.

राजेंद्र गवई यांनी 1 तारखेला पार्किंगला विरोध असणाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्या जाईल असेही सांगितले. याप्रसंगी बानाईच्या तज्ञ मंडळी सहित सभागृहात सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ सिद्धार्थ गायकवाड, प्रा अशोक गोडघाटे यांचे सहित मोठ्या प्रमाणात समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Repo Rate Hike: 44 महिन्यांनंतर RBIचा मोठा निर्णय! रेपो रेट वाढला; कर्ज आणि EMI किती महागणार? FD करणाऱ्यांना काय फायदा?

Gyanesh Kumar : राहुल गांधींच्या आंदोलनानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ज्ञानेश कुमार यांचा 'या' राज्यातील दौरा स्थगित

Petrol-Diesel CNG Price: पुण्यात CNGच्या दरात वाढ झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलही महागले? मुंबईसह राज्यभरात नवे दर किती?

Latest Marathi News Live Update : 'इंडिया' आघाडीच्या निदर्शनानंतर जंतरमंतर परिसरात कडक सुरक्षा

Explained : SIR विरोधात 'इंडिया' आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास विरोधकांची पुढची रणनीती काय? वाचा...

SCROLL FOR NEXT