नागपूर

निर्देशानुसार सुरू झालेली चौकशी; राजकीय हेतूने नव्हे : फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नेहमीच कुठलाही पक्ष एखाद्या घटनेच्या चौकशीची मागणी करीत असतो. याचा अर्थ कुणावर चौकशी करावी म्हणजे त्याला फासावर लटकावे किंवा जेलमध्ये टाकावे असे होत नाही. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यावेळी न्यायधीशांनी याचिकाकर्त्यांनी टाकलेल्या नावांवर एफआयआर दाखल करावी असे थेट आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जे काही निर्देश दिले त्या (Ed inquiry)निर्देशानुसार सुरू झालेले चौकशी आहे. ही कुठल्याही राजकीय हेतूने सुरू केलेल्या चौकशी नाही, असे अजित पवारांवरील (Ajit-Pawar) चौकशीवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. (Devendra-Fadnavis-commented-on-the-inquiry-into-Ajit-Pawar)

एफआयआर नोंदविल्यानंतर यात आर्थिक गोष्टी असल्यामुळेच ईडीने चौकशी सुरू केली आहे. राजकीय हेतूने सुरू केलेली ही चौकशी नाही. मी दिल्लीला कुठल्याही कारणांनी गेलो की पतंगबाजी होते. या पतंगबाजीचा आनंद मी आज दिवसभर घेतला. मी नागपूरचे एक शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन गेलो होतो. धर्मेश प्रधान यांना भेटल्यावर वेळ होता म्हणून अमित शहा यांना भेटलो, असे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बीएससीचे काही मिनिट बघितले तर लोकशाहीला पायदळी तुडविण्याचे काम किंवा फासावर लटकविण्याचे काम सरकारने केले आहे. आम्ही तर बीएससी वर बहिष्कार टाकला आहे. या बहिष्काराचा फायदा घेण्याचे काम सरकारने केले आहे. ओबीसींचा डेटा तयार करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे. त्याच स्वागत आहे. देर आये पर दुरुस्त आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. सरकारने बराच वेळ केला. जाणीवपूर्वक राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दोन दिवसांचे अधिवेशन

दोन दिवसांचेच अधिवेशन होणार आहे. यामुळे कुठलंही आयुध वापरता येणार नाही. कुठलंही प्रस्ताव मांडता येणार नाही. लक्षवेधी व्यापगत केल्या. आजपर्यंत असं कधीही झाले नाही. विधानसभेत आयुध वापरायचे नाही असं होते असेल तर अक्षरशः लोकशाहीला फासावर लटकविण्याचे काम केले जात आहे.

(Devendra-Fadnavis-commented-on-the-inquiry-into-Ajit-Pawar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update: भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT