Devendra Fadnavis statement SIT for sand scam investigation nagpur esakal
नागपूर

Devendra Fadnavis : रेती घोटाळा चौकशीसाठी ‘एसआयटी’; देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा; म्हाडा, औद्योगिक जमिनी देणाऱ्यांची चौकशी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेती घाट प्रकरणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. याबाबत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.

याशिवाय म्हाडामध्येही भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आली आहे. औद्यागिक क्षेत्रातील जमिनी निवासी गाळ्यांसाठी देत, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सदस्यांनी आरोप केला आहे.

त्यामुळे रेती घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत करणार असून म्हाडा, औद्योगिक जमिनी देणाऱ्यांचीही चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली.

अंतिम आठवडा प्रस्तावचे उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, विरोधीपक्ष ज्या आधारावर आकडेवारीवर बोलतात, ती एका वर्षाआधीची आहे. राज्याच्या क्राईम रेट कमी करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे.

त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पाच वर्षांत राज्याचा क्राईमरेट ४० टक्क्याने खाली आणण्यावर भर दिला असून तो ६० टक्क्यावर कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय शिक्षेच्या प्रमाणातही वाढ करण्यावर भर देण्यात येत आहे.

सायबर क्राईम ही मोठी समस्या असून त्यासाठी सर्वोत्तम सायबर क्राईम प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असल्याची माहिती दिली. चाईल्ड प्रोनोग्राफी, महिलांबाबत गुन्हे याबाबत सरकार गांभीर्याने काम करीत असून तत्काळ कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री बुलेटप्रूफ गाडी वापरत नाही

राज्यातील प्रमुख व्यक्तींना सुरक्षा देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः बुलेटप्रूफ गाडी वापरत नाही साध्या गाडीत फिरतात. त्यांना मी अनेकदा विनंती केली अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

यावेळी फडणवीस म्हणाले, आवश्यक त्याना सुरक्षा देण्यात येईल. यापूर्वीच्या सरकारने पोलिसांना मिळालेल्या निर्भया निधीतून आलेली वाहने मंत्रांच्या ताफ्यात दिली. केवळ मंत्री नव्हे खासदारालाही दिल्यात अशी माहिती सभागृहात त्यांनी दिली.

मलाही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न

राजकीय गुन्हे दाखल करण्याचा आरोप होत असताना मागच्या सरकारने मलाही खोट्या गुन्ह्यात फसवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. त्यासाठी संजय पांडे यांना जबाबदारी दिली. याशिवाय प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांचाही समावेश होता. त्याबाबत पेन ड्राईव्ह सादर केल्याचे ते म्हणाले. मात्र, हे सरकार सुडभावनेने काम करीत नसून एखाद्या मंत्र्याची चूक निघाल्यास कारवाई करू, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर इंटरनेट बंदीप्रकरणी दिल्ली हायकोर्टाची तातडीची सुनावणी; सरकारच्या निर्णयाला आव्हान

SCROLL FOR NEXT