devendra fadnavis to stop online betting scam appeal to actor not to do advertisement of these Sakal
नागपूर

Devendra Fadnavis : अभिनेत्यांनो, जुगाराच्या जाहिराती करू नका; देवेंद्र फडणवीस रोखणार ऑनलाइन बेटिंग

पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी ए.यू. स्मॉल फायनांस बँकेत बनावट खाती उघडण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : ‘महादेव ॲप''सारख्या ऑनलाइन जुगारावर रोख लावण्यासाठी राज्यात अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी फ्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. सोबतच तारेतारकांना जुगाराच्या जाहिराती करू नये, असे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून ऑनलाइन बेटिंगद्वारे गरिबांची फसवणूक केली जात असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी ए.यू. स्मॉल फायनांस बँकेत बनावट खाती उघडण्यात आली आहे. यात काही बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ मुस्ताकिन याच्यासोबत अमित शर्मा नावाचा आरोपीची भागिदारी आहे. त्यांचा पैसा विजय जैन याने जे.पी. इन्फ्रा या बांधकाम कंपनीत गुंतवण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले.

यावर गृहमंत्री म्हणून उत्तर देताना फडणवीस यांनी महादेव ॲपची चौकशी ईडीमार्फत केली जात असल्याचे सांगितले. याशिवाय आरोपींचा हेतूसुद्धा जाणून घेण्यात येणार आहे. ऑनलाइन बेटिंग विदेशातून चालते. त्याच्यावर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार कायदा करीत आहे. भविष्यात सायबर क्राईम वाढतच जाणार आहे.

त्यामुळे राज्यात सायबर सेक्युरिटी फ्लॅटफॉर्म तयार केले जात आहे. त्यात सर्व बँका आणि वित्तीय संस्थांचा समावेश केला जाणार आहे. याकरिता निविदा मागवण्यात आल्या आहेत. एकूण १७ कंपन्यांनी याकरिता स्वारस्य दाखवले आहे. आरोपींनी जुगारासाठी कितीही नव्या वाटा शोधल्या तरी त्या बंद केल्या जातील, असाही दावा फडणवीस यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT