DRDO scientist Bhupesh Parate invent advanced Bomb defused system  
नागपूर

क्या बात है! आता बॉम्ब निकामी करणार स्वदेशी ‘वॉटरजेट डीसरप्टर'; DRDO चे संशोधक भूपेश परातेंचा शोध

मंगेश गोमासे

नागपूर ः अतिरेकी, नक्षलवादी आणि बंडखोरांसह समाजकंटक मानवी अथवा आर्थिकहानी करण्यासाठी वा दहशत निर्माण करण्याच्या हेतूने बॉम्ब पेरत असतात. बॉम्ब पेरल्याची माहिती झाल्यानंतर ते निकामी करताना जीवितहानी होण्याचा धोका असतो. पण हा धोका टाळण्यासाठी पुणे येथील संशोधकाने ‘वॉटरजेट डीसरप्टर' नावाचे यंत्र विकसित केले आहे. विशेष म्हणजे हे यंत्र रोबोटच्य माध्यमातूनही हाताळले जाऊ शकते.

भारतात कुठे ना कुठे दहशतवाद आणि नक्षलवादी हल्‍ल्यांच्या घटना घडत असतात. शासनाला आव्हान देण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब पेरणे आणि नक्षलग्रस्त भागात पोलिसांच्या मार्गावर दारुगोळा लपविण्याचे काम केल्या जाते. मात्र, याची माहिती मिळाल्यावर ते निकामी करणे मोठ्या जिकरीचे काम ठरत असते. 

निकामी करीत असताना तो फुटल्यास जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते. यावर उपाय म्हणून ‘आयुध अनुसंधान आणि विकास संस्था’ (डीआरडीओ) येथे काम करणारे शास्त्रज्ज्ञ भूपेश पराते यांनी संशोधन केले. याच विषयाला अनुसरून पराते यांनी आचार्य पदवी मिळविली आहे. संशोधनाच्या आधारावर नावीन्यपूर्ण यंत्र विकसित केले आहे. त्यासाठी त्यांनी ‘हाय स्पीड कॅमेरा’ चा वापर केला आहे. 

या कॅमेराच्या माध्यमातून फ्रेम पर सेंकद १० हजार - १२ हजार वेग मोजल्या जातो. त्यात हाय एनर्जी मटेरिअल वापरून प्रोजेक्टाईल वेग वाढवू शकतो. यासाठी त्यांनी वॉटर ट्युबमागे कार्टेज लावून यंत्र तयार केले आहे. याचा मारा बॉम्ब वा कुठल्याही संशयित वस्तूला निकामी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे कुठलीही जीवितहानी व मालमत्ता हानी टाळण्यास मदत होते.

या यंत्राचे यशस्वी परीक्षण व निर्माण त्यांनी आयुध विकास संशोधन संस्थेत केले आहे. विशेष म्हणजे हे यंत्र रोबो किंवा रोबो बॉम्ब स्टॅन्डच्या माध्यमातून चालविता येणे शक्य आहे.

पुणे येथील खडकवासला येथील ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी‘ (डीआयसी) या संस्थेतून त्यांनी संशोधन कार्याची नोंदणी केली. त्यानंतर चार वर्षात त्यांनी हे संशोधन कार्य पूर्ण केले. त्यासाठी भूपेश पराते यांनी असोसिएट प्रोफेसर सुनील चंदेल, उप-पर्यवेक्षक डॉ. हिमांशू शेखर यांनी मार्गदर्शन केले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा! तोंडात पायमोजा कोंबून अत्याचार, चिमुकलीच्या छातीवर जखमांच्या खुणा; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

SRPF Bharti Scam: SRPF भरती परीक्षेत मोठा घोटाळा? ८५ प्रश्न जसेच्या तसे सराव संचातून आल्याने खळबळ, भरती परीक्षेवर प्रश्नचिन्ह!

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Mahindra-PNB शेअर्स चर्चेत; कारण काय? बाजार आणखी कोसळणार?

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या कमाईमध्ये सोमवारी घट, ४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT