नागपूर

आठही जणांना नाही ‘डेल्टा प्लस’; पुण्याचा अहवाल अद्याप नाही

केवल जीवनतारे

नागपूर : जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे (Delta Plus Variant)नवे संकट उभे ठाकले आहे. मुंबईतून नागपुरात परतलेल्या कोरोनाबाधित (coronavirus) तरुणीसह कुटुंबातील आठ डेल्टा प्लस संशयितांचे नमुने नीरीमध्ये जिनोम स्विक्वेसिंगनंतर हैदराबादेतील सेंटर फॉर सेल्युलर ॲंड मॉलिक्युलर बायोलॉजी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तीन दिवसांत त्याचा अहवाल (Report in three days) प्राप्त झाला असून, आठही जणांच्या नमुन्यात दुसऱ्या कोरोना लाटेतील डेल्टाचे विषाणू नसल्याचे स्पष्ट झाले. सर्वांचे डेल्टा प्लस अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवलेल्‍या शेकडो नमुन्यांच्या अहवालाची मात्र अद्याप प्रतीक्षा आहे. (Eight-people-are-not-affected-by-Delta-Plus)

काही दिवसांपूर्वी नागपुरात जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील तरुणी नोकरीनिमित्त मुंबईत होती. ती लग्नासाठी घरी परतली. मात्र, घरी परतल्यानंतर तिच्यासह कुटुंबातील आठ जण कोरोनाबाधित झाले. एका व्यक्तीमुळे कुटुंब बाधित झाल्याने डेल्टा प्लसची शंका आली. या संशयावरून प्रशासनाने या कुटुंबातील आठही जणांचे नमुने नीरीच्या प्रयोगशाळेत पाठविले.

नीरीने जिनोम स्विक्वेंसिंगनंतर हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी प्रयोगशाळेत पाठवले. अवघ्या तीन दिवसांत अहवाल मिळाला. मात्र, मेडिकल, मेयो तसेच नागपुरातील इतर ठिकाणांहून पुणे आणि दिल्ली येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही.

‘त्या’ चार अहवालांची प्रतीक्षा

महापालिका हद्दीतील चार कोरोनाबाधितांचे नमुने ‘डेल्टा प्लस’ संशयित म्हणून तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. अद्याप त्यांचा अहवाल प्रतीक्षेत असल्याचे नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले. त्यामुळे आता या नमुन्यांच्या अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. त्यामुळे अद्याप डेल्टा प्लसची चिंता कायम आहे.

(Eight-people-are-not-affected-by-Delta-Plus)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kudankulam Data Leak: देशाच्या अणुसुरक्षेला मोठा धोका? भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; कुडनकुलम प्रकरण नेमकं काय आहे?

IPL 2027: नवा कॅप्टन ते हार्दिक पांड्याचे ट्रेड... Mumbai Indians ची मोठे निर्णय घेण्यासाठी इंग्लंडमध्ये मिटिंग

Fine Arts BFA Admission: कला शिक्षणाच्या प्रवेश नोंदणीस रविवारपर्यंत मुदतवाढ; अभ्यासक्रमासाठी १ हजार ३७९ विद्यार्थ्यांची नोंदणी

‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत भूषण प्रधान- सायली पाटील पोहोचले चाहत्यांच्या लग्नात; व्हिडिओ व्हायरल!

Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रवासाचा खर्च किती होणार? तिकीट दर विमानांपेक्षा किती स्वस्त असणार, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT