engineering girl student was killed her friend found injured at same spot police amravati sakal
नागपूर

Crime News : अमरावतीत अभियांत्रिकी विद्यार्थिनीचा गळा चिरून खून; मित्र जखमी अवस्थेत...

मित्रानेच सदर तरुणीची हत्या करून त्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरातील एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गळा चिरून खून करण्यात आला. युवतीच्या मृतदेहाजवळ तिचा मित्रही जखमी अवस्थेत पडून होता. या मित्रानेच सदर तरुणीची हत्या करून त्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली.

बुधवारी (ता. १०) सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडुरा गावात ही घटना घडली. संजना शरद वानखडे (वय १९, रा. कांडली, परतवाडा), असे मृत युवतीचे नाव असून तिचा मित्र सोहम गणेश ढाले (वय १९, रा. तुळजापूरगढी) हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संजना व सोहम दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन राहत होते. मंगळवारी (ता. नऊ) रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास दोघेही संजनाच्या दुचाकीने निघाले होते. आज (ता. १०) सकाळी युवतीच्या मृतदेहाशेजारीच जखमी अवस्थेत पडून असलेल्या सोहमने आरडाओरड केल्याने काही लोक जमले. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साळी घटनास्थळी दाखल झाले. जखमी सोहम ढाले याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मृत युवतीच्या गळ्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने दोन वार केल्याचे दिसून आले. याव्यतिरिक्त हातावर सुद्धा जखमा होत्या, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. घटनास्थळी दुचाकी आढळली.

ती दुचाकी मृत युवतीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. युवतीची हत्या नेमकी कशातून झाली. युवकावर कुणी वार केले, याबाबत सुरवातीला संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परंतु तपासाअंती मृत युवतीचा चुलत भाऊ अमित दिलीप वानखडे (वय ३७) यांनी बडनेरा ठाण्यात तक्रार नोंदविली. त्या आधारे पोलिसांनी सोहम ढालेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला, असे पोलिस निरीक्षक नितीन मगर यांनी सांगितले. दोघेही एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या सेकंड सेमिस्टरला शिकत होते.

हल्ला झाल्याचा बनाव

आमच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला, असे जखमी सोहमने पोलिसांना सांगितले. सोहमने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तो व संजना वडुरा येथे बोलत असताना अचानक तेथे दोन जण आले. त्यांनी सोहम व संजनाशी वाद घातला व नंतर एकाच वेळी हल्ला केला.

संजनाला दिली होती फसविण्याची धमकी

संजना व सोहम यांच्यात एक वर्षापासून ओळख होती. परंतु सोहमच्या त्रासामुळे ती त्याच्याशी ब्रेकअप करणार होती. परंतु सोहम त्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे तो संजनाला मानसिक त्रास देत होता. फसविण्याच्या व जीवानिशी ठार मारण्याच्या धमक्या देत होता, असे संजनाच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT