shadow 
नागपूर

सावली सोडणार तुमची साथ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वर्षातून दोन दिवस असे येतात की या दिवशी आपली सावली दिसत नाही. काही क्षणापुरती सावली गायब होते. हा बिनसावलीचा दिवस नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना रविवारपासून अनुभवता येणार आहे. प्रारंभ नागपूर शहराच्या पूर्व भागात असलेल्या भिवापूर आणि उमरेडपासून होणार आहे. भिवापूरला दुपारी 12 वाजून आठ मिनिटांनी तर उमरेड येथे 12 वाजून नऊ मिनिटांनी हा क्षण अनुभवता येणार आहे.

सूर्याचे उत्तरायन आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अंश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्तादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्‍यावर येतो.

दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायन होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. तसेच सूर्य दररोज 0.25 अंशाने सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर 4 दिवस राहतो. त्यामुळे एकाच 0.50 ठिकाणावरून दोन दिवस आणि 0.25 अंशावर एक दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते. महाराष्ट्रात तीन मे ते 31 मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात.


कोणतीही उभी वस्तू, मनुष्य उन्हात सरळ उभी राहिल्यास सूर्य अगदी डोक्‍यावर आला की सावली दिसत नाही.
-प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, स्काय वॉच ग्रुप.


नागपूर जिल्ह्यातील शून्य सावलीदिन
तारीख               ठिकाण      वेळ
24 मे                भिवापूर     (12.08)
                       उमरेड       (12.09)
25 मे                 कुही         (13.09)
                       हिंगणा       (12.12)
                      बुटीबोरी       (12.11)
26 मे               नागपूर शहर  (12.10)
                       कामठी       (12.10)
                       कळमेश्वर   (12.11)
27 मे               मौदा          (12.09)
                      रामटेक      (12.10)
                      काटोल        (12.13)
                     पारशिवनी        (12.10)
                     सावनेर          (12.11)
28 मे              नरखेड           (12.13)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT