नागपूर

Anil Deshmukh: अजित पवार परत येणार नाहीत! अनिल देशमुखांचा दावा ;म्हणाले,'अनेकांच्या ‘फाईल' तयार'

आमदारांच्या ‘फाईल' तयार असल्याने ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील याची शक्यता वाटत नसल्याने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

Anil Deshmukh on Anil Deshmukh: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या ‘फाईल' तयार असल्याने ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील याची शक्यता वाटत नसल्याने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले.

अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर सर्वांच्याच मनात शंका होती. शरद पवार यांचीची ही खेळी असल्याचे बोलले जात होते. तसे दावेही केले जात होती. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांना सोडून जातील यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्यामुळे सर्वत्र संभ्रमाची स्थिती होती.

आमच्याही मनात शंका होती. शरद पवार यांच्या रोखठोक भूमिकेमुळे संशयाचे मळभ दूर झाले आहे. भाजपच्या महायुतीत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आता परत येतील याती सुतरान शक्यता दिसत नाही असे देशमुख यांनी स्पष्ट केले.(Latest Marathi News)

राष्ट्रवादीत फूट पडली आहे हे स्पष्ट आहे. नेते विखुरल्या गेले हेसुद्धा तितकेच खरे आहे. मात्र अजित पवार यांच्यासोबत फक्त नेते गेले आहेत, तळागाळातील कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबतच आहे. हेच कार्यकर्ते शरद पवार यांची ताकद आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसेल असे दिसत नाही. शरद पवार यांनी पावसात घेतलेल्या सभेने महाराष्ट्राचे राजकीय चित्र कसे पालटले होते हे सर्वांनाच ठावूक आहेत याकडेही अनिल देशमुख यांनी लक्ष वेधले.

अशी बदलते राजकीय भाषा
सध्याच्या राजकीय घडामोडी व तोडफोडीच्या राजकारणावर बोलताना देशमुख यांनी पुढाऱ्यांना सोईची भूमिक घ्यावी लागते. त्यानुसार त्यांची भाषा कशी बदलते हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका मुलाखतीचा दाखला दिला. मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख शेतकऱ्यांचा मसिहा असा केला होता. (Latest Marathi News)

याशिवाय एका लेखात शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव वाढवून दिले होते, शेतकऱ्यांविषयी त्यांना आस्था आहे, शेतकऱ्यांप्रती कटिबद्ध आहेत असेही मोदी यांनी म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT