crops  
नागपूर

नागपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; गहू आणि चण्याच्या पिकांचं मोठं नुकसान

अतुल दंढारे

मेंढला (जि. नागपूर) : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून नरखेड तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काल पासून ढगाळलेले वातावरण होते. बुधवारी सायंकाळी आभाळ आल्यापासून गुरुवारी सकाळी ७ वाजता पावसाला सुरवात झाली. 

सकाळी ७. च्या सुमारास तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे कापून ठेवलेल्या चना व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी चण्याचे पीक कापणीला आले आहे. तर काही ठिकाणी चना जमिनीवर पडले आहे. आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, चना , भाजीपाला, पिकाला मोठा फटका बसला आहे. तसेच हवमान खात्याच्या अंदाजानुसार गारपिट होण्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे असून पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

बुधवारी रात्री पासून नरखेड तालुक्यात रिमझिम पावसाला सुरवात झाली असून सकाळी ७ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात पासून झाला. मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह नरखेड तालुक्यातील,  मेंढला, वाढोणा , रामठी , जलालखेडा, थंडीपवनी, अंबाडा ,  भारसिंगी, खापा, खैरगाव शिवारात जोरदार पाऊस झाला. दिवसभर ढगाळलेल्या वातावरणासह रिमझिम पाऊस सुरु होता. आलेल्या अवकाळी पावसामुळे चना, गहू, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

चण्याचे पीक शेतात कापून पडले आहे. आलेल्या पावसाने ते पीक पूर्ण पने खराब झाले असून काही पिकांना अंकुर फुटत आहे. पाऊस सतत सुरु राहला तर पिकांचे १०० टक्के नुकसान होईल. येत्या दोन दिवस पाऊस राहील असे हवामान खात्यांनी वर्तवलेले आहे. शासनाने तातडीने पिकाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. पावसामुळे गव्हाचे, चनाचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. आलेल्या अवकाळी पावसामूळे  शेतकरी हवालदिल झाला आहे. 

मागील वर्षी कोरोनामुळे त्रस्त झालो होतो परत अजून कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे आणि आता अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असून. गारपीट होण्याची शक्यता आहे. काही तासात गारपीटाची शक्यता आहे  त्यामुळे  माझ्या शेतातील गव्हाचे पूर्ण नुकसान झाले आहे.   

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT