Homeless children harvested 35 quintals of wheat Nagpur news 
नागपूर

मुलांनी शिकता शिकता फुलवली शेती; ३५ क्विंटल गहू पिकवून केला अनोखा पराक्रम

नरेंद्र चोरे

नागपूर : खेळण्याबागडण्याच्या वयातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांनी शिकता शिकता शेतीही फुलवत तब्बल ३५ क्विंटल गहू पिकवून अनोखा पराक्रम केला आहे. त्यांच्या मेहनतीला आलेल्या फळाने संस्थेला तर आर्थिक हातभार लागलाच, शिवाय त्यांच्या गोरगरीब मायबापांचीही खाण्यापिण्याची अडचण दूर झाली. मुलांच्या या कर्तृत्वगुणाची परिसरात सर्वत्र स्तुती होत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या मंगेशी मून यांनी चार वर्षांपूर्वी स्थापन केलेली रोठा (जि. वर्धा) येथील उमेद संकल्प ही संस्था चोर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पारधी मुलांच्या उत्थानासाठी कार्य करते. संस्थेत राज्यभरातील ५ ते १४ वयोगटातील ३५ गोरगरीब मुले-मुली आहेत. संस्थेतर्फे त्यांचे शिक्षण व संगोपन केले जाते. संस्थेची एकूण बारा एकर शेती आहे.

यात गहू, चणा, कापूस, सोयाबीनपासून सेंद्रिय भाजीपाला, फळे व फुलांपर्यंत दैनंदिन आयुष्यासाठी लागणारी जवळपास सर्वच पिके घेतली जातात. येथील गडीमाणसांच्या मार्गदर्शनात ही मुलेच शेती सांभाळतात. सकाळ-सायंकाळ रोप तयार करणे, पेरणी, निंदण व खुरपणीपासून भाजीपाला तोडण्यापर्यंत सर्वच कामे ते मोठ्या उत्साहाने व आवडीने करतात.

सोयाबीन व कापसाचे पीक हातून गेल्यानंतर निराश न होता मुलांनी मेहनत करून यावर्षी चार एकरात ३५ क्विंटल गहू पिकविला. यातील वर्षभरासाठी मुलांना लागणारा गहू ठेवून उर्वरित दरवर्षीप्रमाणे संस्थेतील मुलांच्या गरीब आई-वडिलांना देणार असल्याचे मंगेशी यांनी सांगितले.

‘सिरियस’ बापाकडे मुलांचे दुर्लक्ष

याच संस्थेने काही दिवसांपूर्वी रस्त्यावर भीक मागणारे ७५ वर्षीय शंकर गुरनुले यांना आधार दिला होता. मात्र, काही दिवस आनंदात राहिल्यानंतर अचानक त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. सध्या गंभीर अवस्थेत असलेले शंकर यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातील वणी-वरुड गावचे रहिवासी असलेले शंकर यांना दोन मुले व मुलगी आहे.

वडील ‘सिरियस’ असल्याचे मंगेशी व डॉक्टरांनी कळवूनही त्यांना आतापर्यंत कुणीच भेटायला आले नाही. त्यांनी आमच्यासाठी काहीच केले नसल्याचे कारण देऊन मुलांनी भेटण्यास नकार दिल्याचे मंगेशी यांनी सांगितले. दैनिक ‘सकाळ’ने ३ मार्चच्या अंकात शंकर यांची व्यथा मांडली होती, हे उल्लेखनीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT