नागपूर

Crop Loan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीक कर्ज वाटपाचे ४०० कोटी शिल्लक; नूतनीकरणाची उद्या शेवटची संधी

सकाळ डिजिटल टीम

अकोला: खरीप हंगाम सन २०२३-२४ या वर्षात शेतकऱ्यांनी ता.३० जून पूर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नवीन पीक कर्जासाठी शेतकरी पात्र ठरणार नाही.

नुतनीकरणाची शेवटची तारीख ३० जून असून, त्यातही गुरुवारची सार्वजनिक सुटी आली असल्याने केवळ एकच दिवस नुतनीकरणासाठी मिळणार आहे.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी ३० जूनपूर्वी नुतनिकरणाचे आवाहन केल्याने पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची धावपळ होणार आहे.

जिल्हा उपनिबंधक सहकार विभागाने दिलेल्या माहिती नुसार,विविध बॅंकांकडून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे.

सन २०२३-२४ या वर्षात अकोला जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ९५० शेतकऱ्यांना १२७५ कोटी रुपये खरीप पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले आहे.

ता. २६ जूनपर्यंत जिल्ह्यातील ७६ हजार ४८२ शेतकऱ्यांना ८०२ कोटी ४० लाखांचे खरीप पीक कर्ज वाटप केले आहे.

जिल्ह्यातील नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमागणी अर्ज बॅंकांकडे दाखल करावे आणि नुतनीकरणापासून दूर असलेल्या अशा शेतकऱ्यांनी ता.३० जून पूर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी केले आहे.

नुतनीकरण आवश्यक

खरीप पीक कर्ज वाटपाचे निर्धारीत उदिष्ट साध्य करण्यासाठी नवीन पीक कर्ज वाटप करणे तसेच पीक कर्ज वाढीसह नुतनीकरण करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांच्या घरी जावून सुद्धा पीक कर्जाचे नुतनीकरण करण्याबाबत आवाहन करीत आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अल्प मुदतीच्या पीक कर्जाची परतफेड ३६५ दिवसाच्या आत किंवा दरवर्षी ता.३० जून रोजी किंवा त्यापूर्वी केली पाहिजे.

तेव्हाच हे शेतकरी रिझर्व्ह बॅकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्जाच्या रक्कमेत वाढ करण्यास पात्र ठरतात.

नियमितपणे कर्ज परतफेडीमुळे या सवलतीस पात्र

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना लागू होते.

केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत प्रत्येकी तीन टक्के व्याज सवलत मिळते.

पीक कर्जाचे वेळेवर नुतनीकरण केल्यामुळे शेतकरी बॅंकांच्या इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

संबंधित शेतकऱ्यांनी ता. ३० जूनपर्यंत पीक कर्जाचे नुतनीकरण करणे आवश्यक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT