esakal
नागपूर

Central Railway: 'चेन पुलिंग'मुळे १ हजार ७५ रेल्वेगाड्यांना विलंब! ७९३ प्रवाशांवर कारवाई, 'इतक्या' लाखांचा दंड वसूल

विनाकारण साखळी ओढण्याच्या घटनेमुळे गेल्या आठ महिन्यात १ हजार ७५ रेल्वेगाड्यांना विलंब झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Central Railway: विनाकारण साखळी ओढण्याच्या घटनेमुळे गेल्या आठ महिन्यात १ हजार ७५ रेल्वेगाड्यांना विलंब झाला आहे. प्रवाशांना होणारा मनस्ताप लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने अधिक कडक पावले उचलली आहे.


प्रवासादरम्यान विनाकारण साखळी ओढल्यास आता प्रवाशाच्या खिशाला हजाराचा फटका बसणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी साखळी ओढण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. रेल्वे कायद्याच्या कलम १४२ नुसार दंडाची तसारतूद आहे. रेल्वेने केलेल्या कारवाईत ७९३ जणांकडून २ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

साखळी ओढल्यानंतर लोको पायलटला माहिती होते. यानंतर रेल्वे थांबवावी लागते. प्रवासी संकटात असल्यास त्याला मदत करण्यासाठी रेल्वेने चेन पुलिंगची सुविधा दिली आहे. मात्र, एकदा रेल्वे थांबल्यानंतर रेल्वेची २० मिनिटे व्यर्थ जातात. ट्रेन थांबविणे आणि पुन्हा मार्गस्थ करण्यासाठी किमान २० मिनिटे लागतात. (Latest Marathi News)

याशिवाय रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित होत असते. रेल्वे गाडीच्या मागून धावणाऱ्या अन्य सर्वच गाड्यांच्या वेळापत्रकावर सुद्धा परिणाम होत असतो. रेल्वेगाडीच्या मागे इतर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना अलर्ट देऊन गाडी थांबवीत असल्याची माहिती दिली जाते. रेल्वे थांबविण्यापूर्वी प्रवाशांनी रेल्वेच्या सुरक्षेचा विचार करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Latest Marathi Update : जंतर-मंतरवर CJP आंदोलक आणि निहंग शीख आमनेसामने; धक्काबुक्की, परिस्थिती तणावपूर्ण

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

Madhya Pradesh UCC: मध्य प्रदेशमध्ये एकापेक्षा जास्त विवाहांवर बंदी! महिलांना मिळणार पुरुषांइतकाच संपत्तीचा अधिकार, 'UCC' विधेयक मंजूर

SCROLL FOR NEXT