नागपूर

नागपूर ब्रेकिंग : लॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर कुठल्याही प्रकारे नियंत्रण मिळत नसल्याने १५ ते २१ मार्चपर्यंत शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. यामुळेच शहरात ३१ मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे.

लॉकडाऊन घोषित केल्यानंतरही शहरात रुग्ण वाढीचीसंख्या काही कमी झालेली नाही. उलट रुग्णसंख्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज २,२०० ते ३,००० जवळपास रुग्ण आढळून येत आहे. यामुळे कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत होते. ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागपूर शहरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची महिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काहीही केल्या यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. नागरिकही बिनधास्त शहरात वावरताना दिसत आहे. लग्न समारंभ, खाजगी कार्यक्रमात नागरिकांची गर्दी चांगलीच वाढली आहे. यामुळे कोरोना चांगलाच पसरत आहे. यामुळे २३ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत शहरात मिनी लॉकडाऊन करण्यात आला होता.

शनिवार व रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश नितीन राऊत यांनी मागे केली होती. यानंतर नागपूर जिल्ह्यात १४ मार्चपर्यंत पुन्हा निर्बंध वाढविण्यात आले होते. नागपुरातील भयावह स्थितीवर महत्त्वाची बैठक पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतली. या बैठकीला १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र, शनिवारी झालेल्या बैठकीत लॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक

लॉकडाऊन संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार, व्यापारी संघटना आणि संपादकांशी ऑनलाईन संवाद संवाद साधण्यात आला. यानंतर जिल्ह्यात कोरोनाची भयावह स्थिती बघता लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

  •  नागपूरची परिस्थिती गंभीर ; सर्वपक्षीय बैठकीत निर्बंधाला पाठिंबा
  • आता बंद 31 मार्चपर्यंत, सर्व दुकाने दुपारी चारपर्यंत खुली
  • जिल्ह्यात दररोज 40 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट ; केंद्रसंख्या वाढवणार
  • केंद्र व राज्य सरकारच्या सर्व परीक्षा कोविड प्रोटोकॉलसह
  • धार्मिक कार्यक्रम व सभांना बंदी ; प्रार्थना स्थळे बंद
  • गृहविलिगीकरणातील रुग्ण फिरताना दिसल्यास कॉरन्टाईन सेंटरमध्ये रवानगी
  • कोरोना अहवालाची छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई
  • हॉटेल्स रेस्टॉरंट सातपर्यंत ; घरपोच सेवा अकरापर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT