file photo 
नागपूर

लॉकडाउनचा शेतीकामावर होणार नाही परिणाम; काय आहे कारण?

सतीश तुळसकर

उमरेड (नागपूर) : कोरोनाने आता ग्रामीण भागातसुद्धा पाय पसरायला सुरुवात केल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी नागपूर शहरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास लॉकडाउन लावला जाईल, अशीही चर्चा आहे. उमरेड तालुक्‍यात शेतीसंबंधी साधनांची पुरेशी उपलब्धता असल्याने या लॉकडाउनचा शेतीकामावर फारसा परिणाम होणार नाही, असे कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी सांगितले. 

नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्युसंख्याही वाढत चालली आहे. त्यातच नागरिक नियम पाळत नसल्याने परिस्थिती चिघळत चालली आहे. त्यामुळे उपराजधानीत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. उमरेड परिस्थिती आटोक्‍यात न आल्यास लॉकडाउन लावला जाईल, अशी चर्चा आहे. या लॉकडाउनचा ग्रामीण भागावर, विषेशत: शेतीकामावर काही परिणाम होईल का, हा प्रश्‍न पुढे येत आहे. भिवापूर तालुका वगळता सबंध नागपूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे शेकडोच्या संख्येने रुग्ण आढळून आले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. 

सध्या शेतीच्या कामाला वेग आला आहे. लॉकडाउनमुळे शेतीच्या कामात अडथळा निर्माण होईल, असे बोलले जात आहे. 
जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. आतापर्यंत उमरेड तालुक्‍यात 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेतीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्‍यात एकूण 42 हजार 500 हेक्‍टर लागवडीखालील क्षेत्रापैकी 16 हजार हेक्‍टरमध्ये सोयाबीन पीक, 22 हजार हेक्‍टर क्षेत्रात कपाशी तर 2500 हेक्‍टरमध्ये तूर आणि 1000 हेक्‍टरवर धानपीक घेतले असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी सांगितले. सध्या डवरणी, निंदणी, कीटकनाशकांची फवारणी अशी कामे सुरू आहेत. बऱ्यापैकी पाऊस सुरू झाल्याने अर्धीअधिक धानरोवणी आटोपली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

तालुक्‍यात एकूण 79 कृषी केंद्रे आहेत. त्यांच्याकडे सर्व शेतकऱ्यांना पुरेल इतकी कृषीसंबंधित साधनसामग्री उपलब्ध आहे. नागपूर शहरात सध्या जनता कर्फ्यू लावला आहे. पुढे लॉकडाउन लावला तरी शेती साधनांची कमतरता भासणार नाही. 
-संजय वाकडे, कृषी अधिकारी 

(संपादन : मेघराज मेश्राम) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khan Sir Firing Case: गोळीबारप्रकरणी खान सरांनाच अटक होण्याची शक्यता; दोन्ही अंगरक्षकांनी गोळीबाराची दिली कबुली

Vaibhav Sooryavanshi: Dhoni आणि 'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर आता Vaibhav सूर्यवंशी ऋद्धिमा पाठकचा खळबळजनक खुलासा, Video Viral

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

SCROLL FOR NEXT