Love Love
नागपूर

मानलेले बहीण-भाऊच पडले एकमेकांच्या प्रेमात; अन्...

भाऊ-बहिणीचे नाते असल्यामुळे त्यांच्याकडे कुणीही संशयाच्या नजरेने बघितले नाही

अनिल कांबळे

नागपूर : मानलेल्या बहिणीवरच भावाचे (brother) प्रेम (Love) जडले. तिला लग्नाचा तगादा लावल्यानंतर आडनाव एकच असल्यामुळे तरुणीने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या युवकाने तिचा पाठलाग करून अश्‍लील चाळे केले. तरुणीने होणाऱ्या पतीसह पोलिस ठाणे गाठून युवकाविरुद्ध तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुणी ही शिक्षण घेते. ती मूळची गोंदियाची आहे. तिचे आई-वडील नागपुरात कामगार आहेत. तिच्याच गावातील तरुण नागपुरात कामाच्या शोधात आला. नागपुरात तो खाद्य पदार्थांच्या डिलेव्हरीचे काम करू लागला. त्याची ओळख तरुणीशी झाली. दोघांचेही आडनाव एकत्र असल्यामुळे त्याला तिने घरी बोलावले आणि आई-वडिलांशी ओळख करून दिली. तिला त्याने बहीण (sister) मानले. त्यामुळे तो वारंवार तिच्या घरी ये-जा करीत होता.

भाऊ-बहिणीचे नाते असल्यामुळे त्यांच्याकडे कुणीही संशयाच्या नजरेने बघितले नाही. दोघांची मैत्री वाढत गेली. युवक तिच्यावर एकतर्फी प्रेम (Love) करायला लागला. दोघांमध्ये आकर्षण वाढले. तिलाही तो आवडायला लागला. दोघेही सोबत फिरत होते. दरम्यान, त्याने तिचे काही फोटो काढले. तिच्या सोबत काही सेल्फी काढल्या होत्या. यानंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. परंतु, तरुणीने त्याला आडनाव एकच असल्यामुळे कुटुंबीय काय म्हणतील, असा सवाल केला.

मात्र, युवक काही ऐकायला तयार नव्हता. तो वारंवार तिला लग्न करण्याची गळ घालत होता. कुटुंबीयांनी नागपुरातील युवकाशी तिचे लग्न ठरविले. त्याने तिला लग्न न करण्यासाठी दमदाटी करीत धमकीही दिली. मात्र, तिने शेवटपर्यंत नकार देत साक्षगंध उरकून घेतले. त्यामुळे चिडलेल्या युवकाने तिच्या पतीचा मोबाईल क्रमांक घेऊन प्रेमप्रकरणाची माहिती दिली व लग्न न करण्याचा सल्ला दिला.

त्यानेही होणाऱ्या पत्नीला विचारपूस केली. तिने थेट नकार देऊन सर्व हकिकत सांगितली. भविष्यातही हा त्रास देईल, या भीतीने तिने होणाऱ्या पतीसह गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठून मानलेल्या भावाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT