rain in Nashik Google
नागपूर

विदर्भात आठवडाभरात मृगधारा बरसणार; १२ जूननंतर मॉन्सूनचे आगमन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मॉन्सूनने (Monsoon) अर्धा महाराष्ट्र व्यापला असला तरी, विदर्भात मॉन्सूनच्या (Monsson in vidarbha) आगमनाला आणखी पाच ते सहा दिवस लागणार आहेत. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहे. मॉन्सूनच्या आगमनापर्यंत नागपूरसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनपूर्व मृगधारा बरसण्याची शक्यता आहे. (Monsoon will be in Vidarbha after 12 June)

आजपासून मृग नक्षत्र सुरू होत आहे. त्यामुळे विदर्भातील बळीराजाही आता मॉन्सूनची प्रतीक्षा करीत आहे. मॉन्सून महाराष्ट्राच्या सीमेत दाखल झाल्याने विदर्भात नेमका केव्हा येईल, याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. मॉन्सूनच्या विदर्भातील संभाव्य आगमनाबद्दल हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता ते म्हणाले, महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला असला तरी विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाला आणखी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार आहे.

विदर्भातील मॉन्सूनचे आगमन सर्वस्वी बंगालच्या उपसागरातील सिस्टीमवर अवलंबून असते. तिथे येत्या अकरा जूनला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तो पट्टा आंध्रप्रदेशमार्गे मध्य भारताकडे सरकणार आहे. त्याच्या प्रभावामुळे येत्या १२ ते १४ जूनदरम्यान विदर्भात मॉन्सूनचे आगमन अपेक्षित आहे. तोपर्यंत विदर्भात अधूनमधून वादळासह मॉन्सूनपूर्व सरी बरसेल, असे ते म्हणाले.

पेरणीची घाई न करु नका

मॉन्सूनला थोडा उशीर असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मॉन्सूनपूर्व सरी नियमितपणे हजेरी लावत आहेत. बियाणे महागडे असल्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असा सल्ला हवामान विभागासह कृषी विभागानेही दिला आहे.

(Monsoon will be in Vidarbha after 12 June)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT