PM-Kisan esakal
नागपूर

Agriculture: १४ हजारवर शेतकऱ्यांची ई-केवायसीकडे पाठ! १६व्या हप्त्याला मुकण्याची शक्यता; ई-केवायसी रखडली

जिल्ह्यातील १४ हजार ४२१ शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी पीएम किसान योजनेच्या आगामी १६व्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

Akola agriculture News: जिल्ह्यातील १४ हजार ४२१ शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी पीएम किसान योजनेच्या आगामी १६व्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात ६ डिसेंबर २०२३ पर्यंत १ लाख ९० हजार ६४८ शेतकरी कुटुंबांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केलेली असून त्यापैकी जमिनीचा तपशील अद्ययावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे व ई-केवायसी प्रमाणीकरण करणे याकरिता एकूण १४ हजार ४२१ लाभार्थी प्रलंबित आहेत. त्यामुळे जानेवारी २०२४ मध्ये वितरित होणाऱ्या १६ व्या हप्त्याच्या लाभापासून संबंधित शेतकरी वंचित राहू शकतात, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT