RTO sakal
नागपूर

Nagpur : आरटीओसोबत वाद घातल्यास तुरुंगवारी!

बॉडी वॉर्न कॅमेऱ्याने राहणार सज्ज मोटार वाहन निरीक्षकांकडे सबळ पुरावा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - कारवाई टाळण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांसोबत वाद घालणाऱ्या वाहन चालकांच्या आता अंगलट येणार आहे. कारण वाहकांनी आरटीओ अधिकाऱ्यांसोबत साधलेले सर्व संभाषण बॉडी वॉर्न कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार आहे. तेच अधिकाऱ्यांकडील सबळ पुरावा ठरणार आहे. त्यामुळे आता वाद घातल्यास वाहन चालकांना तुरुंगांत जावे लागू शकते. कारण आरटीओ अधिकाऱ्यांना लवकरच बॉडी वॉर्न कॅमेरे मिळणार आहेत.

नागपूर शहर आणि ग्रामीण रस्त्यावर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ)चे मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांकडून वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. बरेचदा वाहन चालक आणि अधिकाऱ्यांमध्ये कारवाईवरून वादावादी होते. कारवाई टाळण्यासाठी वाहन चालकांकडून दबाव टाकला जातो. आपल्याला ओळखत नाही का? किंवा मोठ्या व्यक्तीला फोन करण्याची धमकी देण्यात येते. त्यावरही अधिकारी मानले नाही तर त्यांच्याशी वाद घातला जातो.

आता हा सर्व वाद कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार आहे. त्यामुळे अधिकारी पुरावा म्हणून आपल्याकडे ठेवू शकतील. वाहन चालकांवर दंडासह आता पुराव्याच्या आधारे प्रसंगी कारागृहात सुद्धा जावे लागू शकते. त्यामुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांशी वाद घालणे आता चांगलेच महागात पडू शकते.

नागपूर विभागात मिळणार ५५ कॅमेरे

राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांना बॉडी वॉर्न कॅमेरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात ३० मोटार वाहन निरीक्षक व २५ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आहेत. त्यामुळे नागपूर विभागाला ५५ च्या जवळपास कॅमेरे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दिवसभराचे होणार चित्रीकरण

नागपूर वाहतूक पोलिस विभाग, रेल्वे सुरक्षा बल या विभागातील पोलिसांजवळ बॉडी वॉर्न कॅमेरे आहेत. आता आरटीओ अधिकाऱ्यांनाही असे कॅमेरे मिळणार आहेत. पोलिस गणवेशातील हा कॅमेरा खांद्यावर किंवा खिशाजवळ लावण्यात येतो. कर्तव्यावर असणारे अधिकारी दिवसभरातील व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतात. दहा तासांच्यावर रेकॉर्डिंग कॅमेऱ्यात साठविण्याची क्षमता आहे. अधिकारी आणि वाहन चालकांची सर्व बातचीत यात रेकॉर्ड होईल. हा पुरावा मानून कडक कारवाई करण्यात येईल.

कारवाई दरम्यान वाहन चालकांशी वाद होतात. वाहन निरीक्षकांना कॅमेरे मिळाल्यास चित्रीकरणातून त्याचा आधार मिळेल. हा आमच्यासाठी चांगलाच पुरावा राहील. त्यामुळे कारवाई करणे आणखी सुलभ व पुराव्यानिशी होईल.

-हर्षल डाके,

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT