Bajrang Dal sakal
नागपूर

‘व्हॅलेंटाइन डे’ विरोधात बजरंग दलाची रॅली; तर पोलिसांचाही असणार वॉच

शहरात पोलिसांचा फौजफाटा सज्ज, निर्भया, दामिनी पथकांचीही नजर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आपल्या आवडत्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू देण्याचा आणि सर्वांचा विशेषःता तरुणाई ज्या दिवसाची वर्षभर प्रतीक्षा करतात तो दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’. या दिवशी तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत असतो. अतिउत्साही असलेले काही जण प्रेमदिवसाचा बेरंग करण्यासाठीही टपलेले असतात. अशा युवकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. पोलिसांची काही पथके साध्या वेशातही वावरणार आहेत.

चांगल्या दिवसाला अप्रिय घटनांचे ग्रहण लागू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. अर्थात, तरुणाईच्या प्रेमात अडथळा म्हणून नव्हे, तर अतिउत्साहींना आवर घालण्यासाठी साध्या वेशात पोलिस गस्तीवर असतील. याशिवाय पोलिसांचे निर्भया पथक, पर्यटन व्हॅन, दामिनी पथकही शहरातील प्रेमीयुगुलांच्या प्रमुख ठिकाणांसह महाविद्यालयांत दक्ष राहणार आहे.

नागपूरमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. १४) तरुणाईमध्ये ‘प्रेमाचा फीव्हर’ चढलेला असेल. शहरातील महाविद्यालयांसह प्रेमीयुगुलांची महाजबाग, फुटाळा, अंबाझरी तलाव यांसह विविध मल्टिप्लेक्‍स, हॉटेल आणि पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

प्रेम व्यक्त करण्यासाठी काही प्रेमीयुगुल एकांत जागीही जातील. अशा वेळी काही अतिउत्साही वा उपद्रवी तरुणांकडून प्रेमीयुगुलांच्या आनंदाला गालबोट लागून अप्रिय घटना घडण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून नियमित नाकाबंदीसह पोलिस बंदोबस्तही सज्ज राहणार आहेत.

‘व्हॅलेंटाइन डे’ विरोधात बजरंग दलाची रॅली

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने आज सायंकाळी बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने तेलंगखेडी येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध भागात या रॅली फिरली. यावेळी जय श्रीराम च्या घोषणा कार्यकर्ते देत होते. मात्र, रॅलीदरम्यान एकाही कार्यकर्त्याने मास्क वा हेल्मेट घातल्याचे दिसून आले नाही. एरवी सामान्यांवर हेल्मेटची कारवाई केल्या जाते. मात्र, यावेळी वाहतूक पोलिस मूकदर्शक असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT