नागपूर

Nagpur : शुल्क परताव्‍यासाठी परीक्षार्थींना करावा लागणार अर्ज २०१९ व २०२१ मधील महाभरती

हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केला. परंतु परीक्षाच झाली नाही. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये पुन्हा जाहिरात काढण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर- मार्च २०१९ व ऑगस्ट २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. परीक्षेचा तत्कालीन अर्ज व आताची माहिती यांचा ताळमेळ जुळल्यावरच खात्यात पैसा ऑनलाइन वळते केले जाणार आहे.

राज्यात शासकीय सेवेत मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. तरुण बेरोजगारांची फळीही मोठी आहे. शासनाकडून महाभरतीची घोषणा करण्यात आली होती. नागपूर जिल्हा परिषदेतील ४०५ पदांसाठी मार्च २०१९ जाहिरातही काढण्यात आली. परीक्षा होईल, अभ्यासाचे फलित होईल, नोकरी लागेल अशी आशा युवकांना होती.

हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केला. परंतु परीक्षाच झाली नाही. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये पुन्हा जाहिरात काढण्यात आली. यावेळीही परीक्षा झाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. शुल्क परत करण्याची मागणी विद्यार्थ्यांची होती.

त्यानंतर आता दोन-चार वर्षांनी सरकारने उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम परत करण्याचे जाहीर केले आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. maharddzp.com वेबसाइटवर विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे.

यात आवश्यक सर्व माहिती भरायची आहे. परीक्षा पोर्टलवर भरण्यात आलेली माहिती व maharddzp.com वेबसाइटवर टाकण्यात आलेली माहिती जुळल्यावर ऑनलाइनरित्या संबंधित अर्जदाराच्या खात्यात रक्कम वळता होणार आहे.

नागपूर जिल्ह्यासाठी पहिल्यात शासनाकडून ३९ लाख ७६ हजार रुपये देण्यात आले. ही रक्कम वळती झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात पुन्हा रक्कम देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

संपूर्ण निधी नाही, व्याजाची रक्कम शासनाकडे

विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कासाठी भरलेली संपूर्ण रक्कम परत मिळणार नाही आहे. सेवा शुल्क वजा करून उर्वरित रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे या काळात व्याजही मोठ्या प्रमाणात मिळाले असून ती रक्कम शासन ठेवणार आहे.

एकूण अर्ज - ४०६९८

पात्र अर्ज - २२०२१

अपात्र अर्ज - १८६७७

प्राप्त निधी ः ३९ लाख ७६ हजार ०५० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT