Nagpur sakal
नागपूर

Nagpur : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अनेक कैद्यांकडे मोबाईल ; दहशतवाद्यांच्याही हाती...

जयेश पुजारीसह ४ अतिरेकी मध्‍यवर्ती कारागृहात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अनेकदा कैद्यांकडे मोबाईल, बॅटरी आणि चार्जर असल्याची बाब उघड झाली आहे. सध्या कारागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोनदा कॉल करून धमकी देत खंडणी मागणार जयेश पुजारी यांच्यासह चार दहशतवादी आहेत. त्यांच्या हातात मोबाईल लागल्यास मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारागृह रक्षकांच्या माध्यमातून कारागृहातील बंदिवानांना सर्रासपणे मोबाईल, बॅटरी, चार्जर, गांजा देण्यात येतो. त्यातून ते कारागृहात राहून बाहेरच्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवताना दिसतात. सध्या देशात पीएफआय सारख्या संघटना स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र समोर आले.

जयेश पुजारीच्या चौकशीत ते बऱ्यापैकी निष्पन्नही झाले. अशावेळी अशा गुन्हेगारांच्या अटकेनंतरही त्यांना कारागृहात सहजरित्या मोबाईल वा इतर साहित्य उपलब्ध झाल्यास ते कशाही पद्धतीने षडयंत्र रचू शकतात. विशेष म्हणजे यापूर्वी नितीन गडकरी यांना फोन करून धमकी देत खंडणी मागणारा जयेश पुजारी

तर दहशतवाद्यांच्याही हाती लागू शकतो मोबाईल

उर्फ कांथा सध्या नागपूर कारागृहात आहे. यापूर्वी त्याने बंगळूरू येथील बेळगाव कारागृहातून अशाच प्रकारे फोन मागवित, अनेकांना कॉल करीत धमकी दिली होती. दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी कारवायात सहभागी असलेले एहतेशाम सिद्दीकी, सेमिदा हनीफ, अशरफ अंसारी या फाशीच्या कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे अशांच्या हातात मोबाईल लागल्यास मोठ्या घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.

यात झाली होती शिक्षा

मुंबईतील ७-११ मध्ये रेल्वेमध्ये सिरिअल बॉम्बस्फोटात एहतेशाम सिद्दीकी याला अटक करण्यात आली होती. याशिवाय २००३ साली मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात पोलिसांनी अशरफ याला अटक करण्यात आली होती. तसेच सेमिदा अन्सारी यांनाही अटक करीत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: पश्चिम बंगाल निवडणूक! मध्यरात्री सुप्रीम कोर्टात हालचाली; 'या' IPS अधिकाऱ्याला तातडीने हटवण्याची मागणी

Karad Accident: टाकीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू; कऱ्हाड तालुक्यातील दुर्दैवी घटना, चेंडू काढण्यासाठी गेला अन् काय घडलं?

मोठा निर्णय! शाळा ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत फाईलचा प्रवास आता ऑनलाइन; शाळा, तुकडी मान्यता, अनुदानाचा वाढीव टप्पा मंजुरीतील वशिलेबाजी, बनावटगिरी थांबणार

सोलापूरकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जागरण! पोलिसांच्या मदतीसाठी ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क, वाचा...

मोठी बातमी! शिक्षण आयुक्तांच्या आदेशाने शिक्षकांची वाढली डोकेदुखी; १ मे रोजी निकालावेळी पालकांना दाखवाव्या लागणार त्यांच्या मुलांच्या उत्तरपत्रिका

SCROLL FOR NEXT