Kirit-Somaiya sakal
नागपूर

नागपूर : किरीट सोमय्यांना न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा आरोप करीत दिवाणी आणि फौजदारी याचिका दाखल केली आहे.

केतन पळसकर : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना सत्र न्यायालयाने समन्स बजावत २० नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा आरोप करीत दिवाणी आणि फौजदारी याचिका दाखल केली आहे. यावर आज नागपूर येथील दिवाणी न्यायाधीशासमक्ष सुनावणी झाली.

याचिकेनुसार, मागील काही महिन्यांपासून किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात, नेत्यांविरोधात सातत्याने आरोप करून मोहीम उघडली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरिट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी करत असतात. सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत.

स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भाव ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. किरीट सोमय्या यांनी ‘साम’ वृत्तवाहिनीशी बोलताना वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के काँग्रेसला मिळतो, असा कुठल्याही पुराव्या शिवाय धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. त्यामुळे, झालेल्या बदनामीची भरपाई म्हणून १ रुपया द्यावा, असेही याचिकेमध्ये म्हटले आहे. सर्व बाबी लक्षात घेता किरीट सोमय्या यांना न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता न्यायालयामध्ये स्वत: किंवा वकिलाला हजर करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT