Nagpur Crime  Esakal
नागपूर

Nagpur Crime: 'तू तिला किती वेळा भेटलास?' असं म्हणत कॅफे मालकाला जबर मारहाण, आठ जणांकडून चाकूचा धाक दाखवत अपहरण

प्रेयसीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आठ गुंडांनी चाकूच्या धाकावर एका कॅफेमालकाचे भरदिवसा अपहरण केले.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Cafe Owner Abducted and Beaten: प्रेयसीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आठ गुंडांनी चाकूच्या धाकावर एका कॅफेमालकाचे भरदिवसा अपहरण केले. त्यानंतर त्याला निर्जनस्थळी नेत बेदम मारहाण केली. राणाप्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


संतोष नरेश जोगेकर (२५) असे तक्रारदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगणा टी पॉईंट परिसरात त्याचे कॅफे आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तो कॅफेमध्येच असताना तीन तरुण आले. सुरुवातीला त्यांनी बर्थडे पार्टीसाठी कॅफे हवा असल्याचे सांगितले. थोड्या वेळात तोंडावर रुमाल बांधून एक तरुण आला. त्याने संतोषला त्याचे नाव विचारले. त्यानंतर अचानक चौघांनीही शिवीगाळ करत संतोषला मारहाण केली.

तरुणाने रुमाल काढला असता तो हर्षल ब्राह्मणे (वय २५, रा. दाते लेआऊट) असल्याचे संतोषने ओळखले. हर्षलने खिशातून चाकू काढत संतोषला फरफटत कॅफेबाहेर आणले. त्याच्या हातात चाकू असल्याने इतर कुणी बचावासाठी समोर आले नाही. हर्षलचे आणखी पाच साथीदार बाहेर उभे होते. (Latest Marathi News)

आरोपींनी संतोषला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसविले व अजनी रेल्वे कॉलनीजवळील मैदानावर नेले. तेथे एका मुलीला किती वेळा भेटलास, अशी विचारणा हर्षलने केली. यानंतर हर्षलने परत संतोषला मारहाण केली. सायंकाळी दोन आरोपींनी मोटारसायकलवरच संतोषला परत कॅफेजवळ सोडले. त्याने राणाप्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी हर्षल व त्याच्या सात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Exam Result : ‘नीट’ परीक्षेतील गोंधळाचे सत्र कायम; पुण्यातील विद्यार्थ्याला ७०७ ऐवजी मिळाले २१७ गुण

Cheesy Potato Tortilla: रविवारी नाश्त्यात काय बनवायचं प्रश्न पडलाय? 15 मिनिटांत तयार करा चीजी बटाटा टॉर्टिला; घरचे बोटं चाटत राहतील!

72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'आर्टिकल 370' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, मराठी सिनेसृष्टीचाही राष्ट्रीय स्तरावर डंका

CM Devendra Fadnavis : पुणे होईल देशाचे ‘ग्रोथ इंजिन’; तीन उन्नत महामार्गाचे भूमिपूजन, १६ हजार ७०१ कोटींचा रस्ते प्रकल्प

Nitin Gadkari : पुरंदर विमानतळालगत नवे पुणे उभारा; शहरातील वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सूचना

SCROLL FOR NEXT