Crime News 
नागपूर

Nagpur Crime : प्रेमप्रकरणात आडकाठी आणल्याने तिघांवर चाकू हल्ला; आरोपी फरार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : प्रेमप्रकरणात आडकाठी आणून गुन्हा दाखल करीत, पोलिस कारवाई करण्याचा राग मनात धरुन युवकाने तिघांवर चाकूने हल्ला करीत, गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (ता.२५) श्‍यामनगर परिसरात घडली. याप्रकरणी बिसमिल्ला रफीक कनोज (वय ३७,रा. नविन नगर, प्रायमरी शाळेजवळ, पारडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रमजान उर्फे मुनिर इकराम अंसारी (वय १९, रा. सबीना ले-आउट, आजरी माजरी) असे आरोपीचे नाव आहे. इकबाल शेख अजिज शेख, (वय ४०) आणि राजू शंकर धमगाये (वय ३९) साहिल रफीक कनोज (वय १९, तिन्ही रा. गल्ली नं १, हसनबाग कब्रस्तान) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी रमजान याने प्रेमप्रकरणातून मुलीला पळवून नेल्याप्रकरणी इकबाल यांनी त्याच्याविरोधत गुन्हा दाखल केला होता. त्यातून त्याला अटक झाली होती. दरम्यान त्याच्या मनात त्याबाबत राग होता. शनिवारी (ता.२५) इकबाल आणि राजू आपल्या दूचाकीने पारडी परिसरातील श्‍यामनगर येथून जात असताना मागून कारने (एम.एच. ३१ ए.जी. ८११०) कट मारली.

त्यातून दोघांनीही थांबून त्याला ‘हमको मारेगा क्या, कैसी गाडी चलाता है’ असे म्हटले. त्यावरुन रमजान कार लावून बाहेर आला आणि चाकूने इकबाल यांच्या पाठीवर चाकुने वार करण्यास सुरुवात केली. त्याला थांबविण्यासाठी राजू मध्ये येताच, त्याच्याही पाठीवर वार केले.

याबाबत साहिलला संपर्क केल्यावर तो येताच, त्याच्याही बोटावर वार करीत, जखमी केले आणि कार सोडून फरार झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सरकटे गुन्हा दाखल करीत, आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

RAVINDRA JADEJA: रवींद्र जडेजाचं वनडे करिअर संपणार? 2027 विश्वचषकासाठी डच्चू, अक्षर पटेलला प्राधान्य; अहवालात मोठा दावा

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

SCROLL FOR NEXT