Nagpur Crime  Esakal
नागपूर

Nagpur Crime: संतापजनक! शंभर रुपयांसाठी मुलाकडून आईचा खून, भोकरबर्डी येथील घटना

आईने शंभर रुपये दिले नाहीत म्हणून संतप्त झालेल्या मुलाने तिचा खून केल्याची धक्कादायक घटना धारणी तालुक्यातील भोकरबर्डी गावात शुक्रवारी (ता. एक) रात्रीच्या सुमारास घडली.

सकाळ डिजिटल टीम

संतापजनक! शंभर रुपयांसाठी मुलाकडून आईचा खून, भोकरबर्डी येथील घटना

Nagpur Dharni Son killed Mother: आईने शंभर रुपये दिले नाहीत म्हणून संतप्त झालेल्या मुलाने तिचा खून केल्याची धक्कादायक घटना धारणी तालुक्यातील भोकरबर्डी गावात शुक्रवारी (ता. एक) रात्रीच्या सुमारास घडली. गंगाबाई जांबेकर (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

गंगाबाई यांनी शंभर रुपये न दिल्यामुळे रागाच्या भरात मुलगा पवनने त्यांना काठीने बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. गावातील रोहित पाल यांनी धारणी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भोकरबर्डी येथील ग्रामस्थांकडे विचारणा केली असता पवन हा व्यसनाच्या आहारी गेला असल्याचे त्यांना समजले.

शंभर रुपयांसाठी त्याने आईला काठीने बेदम मारहाण केल्याचेही गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांनी संशयित मारेकरी मुलास ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. पवन याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ठाणेदार जाधव, उपनिरीक्षक विशाल राठोड, उपनिरीक्षक झाल्टे, धीरज जांबे, ईश्वर, नितीन बोरसिया आदींनी घटनास्थळी भेट दिली. (Latest Marathi News)

मुलाने आईचा खून केल्याची माहिती मिळताच भोकरबर्डी येथे पोहोचून आरोपी पवन जांबेकर याला अटक केली. पंचनामा करून गंगाबाई यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.- अशोक जाधव, ठाणेदार, धारणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे गटातील नेत्याला मारण्यासाठी चोरबाजारातले चॉपर अन् देशी पिस्तुलचा वापर, प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात धक्कादायक माहिती समोर!

IND A vs NZ A Live : W,W,W... १ धाव ३ विकेट्स; गंभीरने ज्याला कमी लेखले, त्याने मॅच फिरवली; शेवटच्या षटकांत नाट्यमय घडामोडी

ITBP Foundation Day: आयटीबीपी स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून हिमवीरांच्या शौर्याचे कौतुक

Latest Marathi News Live Update : कोरड्या कृष्णा नदीपात्रात राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

Jal Jeevan Mission: आता खेड्यातही नळाच्या पाण्यावर पाणीपट्टी, देखभाल दुरुस्तीसाठी ग्राम समित्यांकडे जमा होणार निधी

SCROLL FOR NEXT