नागपूर

Nagpur Crime: आधी पतीच्या डोक्यात दगड घालून हत्या, नंतर मृतदेहासोबत घालवली रात्र; आरोपी पत्नी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

पतीकडून होणाऱ्या सातत्याच्या त्रासाला कंटाळून तो झोपेत असताना खून केला. मात्र, त्यानंतर त्यांनी रात्रभर मृतदेहाच्या शेजारी बसून रात्र काढली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime: पतीच्या दारूच्या व्यसनामुळे संतप्त झालेल्या पत्नीने रात्री पती झोपलेला असताना त्याच्या डोक्यावर दगडाने वार करून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पत्नीने खून केल्यानंतर सकाळी कामठी पोलिसांकडे जाऊन माहिती दिली.

आनंद भदुजी पाटील (वय ५०) असे मृत पतीचे नाव असून अरुणा आनंद पाटील असे आरोपी पत्नीचे नाव आहे. त्यांना मयूर नावाचा एक मुलगा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद पाटील हा मजुरीचे काम करीत होता. दारूचे व्यसन असल्याने तो कमावलेले पैसे दारूत उडवायचा. त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. अनेकदा तो दारूच्या पैशासाठी पत्नीला मारहाण करायचा.

शनिवारी त्याने दारूसाठी पत्नीला पैसे मागितले. मात्र, पैसे नसल्याने तिने नकार दिला. मात्र, त्याने वाद घालून पत्नीला मारहाण केली. त्यानंतर आनंद दारू पिऊन घरी आला आणि झोपी गेला. पत्नीच्या मनात सातत्याने घडणाऱ्या प्रकारामुळे संताप असल्याने तिने मध्यरात्री आनंदच्या डोक्यात दगड घातला.

यामुळे झोपेतच त्याचा मृत्यू झाला. यानंतर रविवारी सायंकाळी तिने नवीन कामठी पोलिस ठाणे गाठून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत, उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, पत्नीला अटक केली असून तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

पतीच्या मृतदेहासोबत घालविली रात्र
अरुणा पाटील यांनी पतीकडून होणाऱ्या सातत्याच्या त्रासाला कंटाळून तो झोपेत असताना खून केला. मात्र, त्यानंतर त्यांनी रात्रभर मृतदेहाच्या शेजारी बसून रात्र काढली.

दिवसभर याबाबत तिने कुणालाही माहिती न देता, सायंकाळच्या सुमारास पोलिस ठाणे गाठून त्यांनी याची माहिती दिली. यावेळी घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली. खुनाच्या तब्बल अठरा तासानंतर ही माहिती समोर आली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचेही सांगीतले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT