fraud  sakal
नागपूर

Nagpur : वित्त अधिकाऱ्याने लावला आपल्याच संस्थेला चुना

संस्थेची १.२० कोटीने फसवणूक

राजेश नागरे, सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील लिबर्टी चौकात असलेल्या एका संस्थेत वित्त अधिकारी म्हणून काम करणाऱ्याने आपल्याच संस्थेला १ कोटी २० लाखाने चुना लावला. प्रेमकुमार सॅम्युअल पोतराजू (४०) यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुमन शेखर राऊत (३०) रा. महालक्ष्मी अपार्टमेंट, झिंगाबाई टाकळी असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रेमकुमार हे संस्थेत सरचिटणीस आहेत. ते मुळचे तेलंगणा येथील असून सध्या नागपूरला वास्तव्याला आहेत. सागर ज्योती शिक्षा निकेतन या संस्थेचे मुख्यालय सदर येथील लिबर्टी टॉकीज चौकजवळ आहे.संस्थेची १.२० कोटीने फसवणूक

आरोपी सुमन हा २०१८ पासून संस्थेत वित्त अधिकारीपदावर होता. तोच सर्व आर्थिक बाबी हाताळायचा. सुमनसह प्रेमकुमार या दोघांचे मोबाईल क्रमांकही संस्थेच्या खात्याशी जोडण्यात आले होते. सुमनने खात्यातून अध्यक्ष व सचिवांचे मोबाईल क्रमांक काढून घेतले. त्याने केवळ आपला मोबाईल नंबर खात्याशी लिंक राहू दिला.

त्यामुळे संस्थेच्या खात्यातील व्यवहारांचे मेसेज आणि ओटीपी फक्त त्याच्याच मोबाईलवर येऊ लागले. याचा फायदा घेत त्याने संस्थेच्या खात्यातून तब्बल १ कोटी २० लाख रुपये काढले व आपल्या खात्यात वळते करून संस्थेची फसवणूक केली.

ही संस्था गरीब मुले व महिलांच्या कल्याणासाठी कार्य करते. जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत सुमनने संस्थेच्या खात्यात २ कोटी ४२ लाख एक हजार रुपये बेकायदेशीरपणे जमा केले. या कालावधीत त्याने ४ कोटी ५५ लाख २८ हजार ५८४ रुपये काढले.

त्याच्या साथीदारांच्या मदतीने त्याने संस्थेच्या दिल्ली येथील खात्यातून ७ कोटी रुपये काढले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संस्थेने दिल्लीत तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याशिवाय त्याने संस्थेत अनेक आर्थिक व्यवहार अनधिकृतरित्या केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT