Nagpur In Manja Hundreds Stuck Death Of Birds  SAKAL
नागपूर

नागपूर : मांजामध्ये अडकून शेकडो पक्ष्यांचा मृत्यू

बचावासाठी सरसावल्या स्वयंसेवी संस्था

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) काळात उडविण्यात येणाऱ्या पतंगाच्या (kite festival) मांजात अडकून पक्ष्यांचे होणारे मृत्यू (Death Of Birds)कमी करण्यासाठी शहरातील पाच संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जखमी पक्ष्यांना वाचविण्याची संधी मिळणार असल्याचे समाधान असले तरी लोकांनी पतंग उडविण्यासाठी घातक मांजाचा वापर करू नये, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. सहभागी संस्थांमध्ये सृष्टी पर्यावरण मंडळ, बर्ड्स ऑफ विदर्भ, इंडियन वाइल्ड लाइफ, हेरिटेज कन्झर्व्हेशन सोसायटी आणि युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया नागपूर युनिटचा समावेश आहे. नागरिकही मांज्यामुळे जखमी होतात अथवा मृत पावतात. यामुळे या मांज्यासंदर्भात कडक धोरण राबविण्याची मागणी केली जात आहे. पान २ वर

ही मोहीम १ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. यात साधारण शेकडो तरुण स्वयंसेवक म्हणून काम करतील. मांजात अडकून स्वत:ला सोडवू न शकल्याने शेकडो पक्ष्यांचा दरवर्षी जीव जातो. चिनी मांजाच्या वापराने तसेच काचेचे कोटिंग असलेल्या मांजामुळे मोठ्या प्रमाणात पक्षी जखमी होतात. मांजामुळे बरेचदा पक्ष्यांचा गळा कापला जातो. त्यांचे पंख छाटले जातात तर कित्येक पक्ष्यांच्या अंगावर मांजाच्या जखमा दिसतात. गेल्यावर्षी या संस्थेत शेकडो पक्षी जखमी झाल्याची नोंद आहे. यासाठी पक्षी वाचवा मोहिमेद्वारे जखमी पक्षी दिसल्यास सेमिनरी हिल्स येथील ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ संस्थेशी संपर्क केल्यास पक्ष्यांना वाचवले जाऊ शकते.

सण साजरा करताना त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. जीवघेण्या मांजाचा वापर टाळा, असे आवाहन पक्षीप्रेमी व स्वयंसेवी संस्थांनी केले. स्वयंसेवी संस्थांनी फेसबुकच्या माध्यमातून ‘पक्षी वाचवा’ मोहिमेचा प्रसार सुरू केला. त्यामुळे जखमी पक्षी आढळल्यास या संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांक (०७१२-२५१५३०६) आणि विनीत अरोरा (९८६००६२९९४) यांना कळल्यास तातडीने पक्ष्यांवर उपचार केले जाऊ शकतात, अशी विनंती सृष्टी पर्यावरण मंडळाचे सचिव विनीत अरोरा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT