नागपूर

Express Railway Schedule: मुंबई-हावडा एक्स्प्रेससह 'या' पाच गाड्या आजपासून विलंबाने, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

राऊरकेला-झारसुगुडा दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम केले जाणार आहे. दोन रेल्वेगाड्या रद्द तर पाच गाड्यांना विलंबाने सोडण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Indian Railway from Nagpur: राऊरकेला-झारसुगुडा दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम केले जाणार आहे. दोन रेल्वेगाड्या रद्द तर पाच गाड्यांना विलंबाने सोडण्यात येणार आहे. मुंबईहून धावणारी मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस हावडा येथून ६ फेब्रुवारी रोजी ३ तास ४५ मिनिटे उशिराने सुटणार आहे.

कुर्ला येथून धावणारी कुर्ला-कामाख्या एक्स्प्रेस ६ फेब्रुवारी रोजी ६ तास उशिराने सोडण्यात येणार आहे. राजेंद्र नगर येथून धावणारी राजेंद्र नगर-दुर्ग दक्षिण बिहार एक्स्प्रेस ६ फेब्रुवारी रोजी ३ तास विलंबाने सुटेल. (Latest Marathi News)

तर परतीला दुर्ग-राजेंद्र नगर दक्षिण बिहार एक्स्प्रेस ७ फेब्रुवारीला ३ तास विलंबाने सुटेल. तसेच योग नगरी ऋषिकेश येथून धावणारी योग नगरी ऋषिकेश-पुरी उत्कल एक्स्प्रेस हावडा ३ तास विलंबाने सोडण्यात येणार आहे. तसेच इतवारी-टाटानगर एक्स्प्रेस आणि टाटानगर-इतवारी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या ७ फेब्रुवारी २०२४ रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT