nagpur Municipal Corporation placed Broom on Ashok Chakra Complaint lodged Sitabardi police station sakal
नागपूर

Nagpur : नागपूरात खळबळ! अशोक चक्रावर लावला महानगरपालिकेचा झाडू; सीताबर्डी ठाण्यात तक्रार दाखल

Nagpur Latest News | महापालिकेतर्फे रविवारी सकाळी स्वच्छता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरमध्ये अशोक चक्रावर झाडू ठेवण्यात आल्याचे दर्शविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेतर्फे रविवारी सकाळी स्वच्छता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरमध्ये अशोक चक्रावर झाडू ठेवण्यात आल्याचे दर्शविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री आणि आमदार डॉ. नितीन राऊत यांनी याविरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी ठाण्यात जमाव आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

केंद्राच्या स्वच्छता मोहिमेंतर्गत जनजागृतीकरिता महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानुसार रविवारी (ता.२२) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास स्वच्छता दौडचे आयोजन करण्यात आले होते.

त्यासाठी महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली. स्वच्छतेचा संदेश देणारे बॅनरही लावण्यात आले होते. मात्र, या बॅनरमध्ये अशोक चक्रावर झाडू लावलेला लोगो असल्याची बाब निदर्शनास आली. त्यावर माजी मंत्री आणि आमदार डॉ. नितीन राऊत यांनी आक्षेप घेतला.

याबाबत त्यांनी प्रथम सदर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम १९७१ च्या कलम २ अन्वये महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, हद्द सीताबर्डी ठाण्याची असल्याने त्यांनी सीताबर्डी ठाण्यात पाठविले. सायंकाळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सीताबर्डी ठाण्यात पोहचले.

कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान ठाण्यात पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राला मनपाने पायदळी तुडवत असल्याचे बॅनरवर दाखविले आहे. यावरून देशाचे, राष्ट्रीय झेंड्याचे, राष्ट्रीय चिन्हाचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न भाजप आणि नागपूर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सूडबुद्धीने केला आहे.

- डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री आणि आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT