NMC Nagpur  
नागपूर

धक्कादायक! नागपूर महापालिकेकडून ‘हॉटस्पॉट' परिसर लपवण्याचा प्रयत्न; रुग्ण वाढण्याची भीती

राजेश प्रायकर

नागपूर : महापालिका ‘हॉटस्पॉट' परिसराची माहिती लपवित असल्याने अनेक नागरिक बिनधास्त फिरत आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. महापालिकेने हॉटस्पॉट परिसराची माहिती दररोज जाहीर केल्यास त्या-त्या परिसरातील नागरिक सावध होण्याची शक्यता आहे. यातून काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण शक्य आहे. परंतु महापालिकेकडूनच कोरोनावर नियंत्रणाच्या या पर्यायावर माती टाकली जात असल्याचे चित्र आहे.

शहरात कोरोनावर नियंत्रणासाठी आयुक्तांपासून सारेच अधिकारी दिशाहीन कामे करीत असल्याचे चित्र आहे. शहरातील वाढती बाधितांची संख्या लक्षात घेता अनेक परिसर प्रतिबंधित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. परंतु महापालिकेकडून हॉटस्पॉट परिसराबाबतच माहिती लपविली जात असल्याचे दिसून येत आहे. कुठल्या परिसरात सर्वाधिक बाधित आहे, याबाबतची माहिती लपवून महापालिका एकप्रकारे नागरिकांना आणखी धोकादायक स्थितीत घेऊन जात असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे.

खर्च वाचविण्याचा प्रयत्न

हॉटस्पॉट परिसर जाहीर केल्यास ते क्षेत्र प्रतिबंधित करावे लागणार आहे. त्यासाठी टिन, लाकडी साहित्य आदी बिछायत केंद्रांकडून मागवावे लागणार आहे. यासाठी अर्थातच महापालिकेचा खर्च वाढणार आहे. यापूर्वी अनेक बिछायत केंद्र संचालकांचे पैसे अद्यापही महापालिकेने दिले नसल्याची धक्कादायक माहितीही सूत्राने सांगितली.

सोशल मिडियावर महापालिकेची अब्रू वेशीला

सोशल मिडियावर कोरोनाची सद्यस्थिती व मागील स्थितीची तुलना करण्यात येत आहे. एवढेच नव्हे काही ग्रुपवर महापालिकेचे बाधितांसाठी असलेल्या नियंत्रण कक्षाबाबतच शंका व्यक्त करण्यात येत आहे. यातून आताचे आयुक्त राधाकृष्णन बी. व माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याची तुलना केली जात आहे. यात अनेक नागरिक मत व्यक्त करताना महापालिकेची अब्रू काढत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena पक्ष अन् धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे गेलं तर शिंदेंपुढे काय पर्याय? भाजपमध्ये विलीन होणार?

Chamoli Tunnel Accident: १९ कामगारांना रात्रीतून बाहेर काढले; चमोलीतील बोगदा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून मदतकार्याची पाहणी

Pimpalgaon Joge Dam: धरण ९६ टक्के भरताच मेमाणे वस्तीत पाणी शिरले! २० कुटुंबांसह १०० ते १२५ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

Skip the Elevator: रोज जिना चढल्याने Heart Attackचा धोका कमी! पाहा काय सांगतो नवीन संशोधन अहवाल...

SCROLL FOR NEXT